लष्करात चक्क पेंग्वीन झाला Major General; अधिकाऱ्यांनी केला Salute! पाहा Photos

Penguin In Army Officers Salute Him: मुंबईच्या प्राणीसंग्रहालयामधील पेंग्वीन पाहण्यासाठी आजही मुंबईकरांची मोठी गर्दी होते. मात्र एका देशामध्ये चक्क पेंग्वीनला लष्करामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं आहे. या पेंग्वीनला मेजर जनरलची पदवी देण्यात आली आहे. या देशातील हे तिसरं सर्वात मोठं पद आहे. या पदवी प्रदान समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...

| Aug 26, 2023, 11:16 AM IST
1/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

ज्या देशामध्ये पेंग्वीनला पदवी देण्यात आली तो देश म्हणजे नॉर्वे. हा सोहळा अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला. 

2/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

नॉर्वेमधील एडिनबर्ग प्राणीसंग्रहालयामध्ये राहणाऱ्या सर निल्स ओलाव थ्री नावाच्या एका पेंग्वीनला नॉर्वेच्या लष्कराने मेजर जनरल पद बहाल केलं. 

3/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

पेंग्वीन हा पक्षी नॉर्वेच्या नॉर्वेजियन किंग्ज गार्ड म्हणजेच लष्करासाठी लकी मानला जातो. त्यामुळेच त्याला ही पदवी देण्यात आली आहे. 

4/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

प्राणीसंग्रहलायामध्ये आयोजित एका शानदार कार्यक्रमामध्ये सर निल्स ओलाव थ्री या पेंग्वीनला पदवी देण्यात आली. पेंग्वीनला लष्करी पदवी देण्याची परंपरा या देशामध्ये 1972 पासून आहे. 

5/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

1972 साली नॉर्वेच्या लष्कराने पहिल्यांदा एक पेंग्वीन दत्तक घेतला होता. तेव्हापासूनच पेंग्वीनला लष्कराकडून पदवी देण्याची पद्धत सुरु झाली.

6/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

सर निल्स ओलाव थ्री हा पेंग्वीन आधी ब्रिगेडिअर पदावर होता. आता त्याला मेजर जनरल पदवी बहाल करण्यात आली आहे.

7/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

सर निल्स ओलाव थ्री हा एडिनबर्गमधील प्राणीसंग्रहालयामध्ये राहतो. सोशल मीडियावरुन या पदवीदान समारंभाचे फोटो प्राणीसंग्रहालयानेच शेअर केले आहेत. 

8/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

लष्करी ड्रील टीमच्या उपस्थितीमध्ये या पेंग्वीनला पदवी देण्यात आली. त्याला एक खास बॅण्ड लष्कराने दिला असून त्यावर त्याची नवीन पदवी कोणती आहे हे लिहिलं आहे.

9/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

मोठा लवाजमा या सोहळ्यासाठी उपस्थित होता. ज्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांबरोबर प्राणीसंग्रहालयाचे अधिकारीही उपस्थित होते. या पेंग्वीनला लष्करी अधिकाऱ्यांनी सॅल्यूटही केला. 

10/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

अगदी थाटात हा पेंग्वीन आपली पदवी घेण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांसमोरुन चालत आला.

11/11

Penguin gets third highest rank in Norwegian army after promotion

सर निल्स ओलाव थ्रीला दिलेली ही पदवी नॉर्वेच्या लष्करामधील तिसरी सर्वात मोठी पदवी आहे. या पेंग्वीनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.