गडबड! महिंद्राकडून 'या' मॉडेलच्या 1 लाखांहून अधिक कार परत घेण्याचा निर्णय, तुम्ही वापरता का?

Mahindra & Mahindra Cars : मुळात कार खरेदीचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशझोतात आला तेव्हातेव्हा महिंद्राचच नाव पुढे आलं. पण, आता हीच कंपनी काहीशी संकटात आहे.   

Aug 21, 2023, 15:47 PM IST

Mahindra & Mahindra Cars : देशातील अग्रगणी वाहन निर्माते म्हणून ओळख असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनं आजवर भारतातील अनेकांचंच स्वत:च्या कारचं स्वप्न पूर्ण केलं. 

1/7

कंपनी अडचणीत

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

Mahindra & Mahindra Cars : खिशाला परवडणाऱ्या दरात कमाल कार तयार करणारी हीच कंपनी आता काशीही अडचणीत आली आहे. काय आहे ती अडचण? पाहून घ्या. 

2/7

तुम्हीही ही कार वापरता का?

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

Mahindra & Mahindra Cars : महिंद्रा अँड महिंद्राकडून कंपनीचं मॉडेल असणाऱ्या जवळपास 1 लाखांहून अधिक कार युनिटना परत बोलवण्यात आलं आहे. तुम्हीही ही कार वापरता का? 

3/7

एसयुव्ही कार

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

सर्वाधिक विक्री होणारीच एसयुव्ही कार महिंद्रानं परत मागवली आहे. शेअर बाजारतही त्यासंबंधीची माहिती देण्यात आली. 

4/7

इंजिनमध्ये बिघाड

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

कंपनीच्या XUV700 या कारच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये बिघाड झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. 

5/7

स्पोर्ट्स यूटिलिटी वेहिकल

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

स्पोर्ट्स यूटिलिटी वेहिकल (एसयूवी) एक्सयूवी700 च्या इंजिनमध्ये वायरिंगच्या तक्रारीनंतर तब्ब लाखाभराहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. त्यामुळं तुम्हीही ही कार वापरत असाल, तर आताच ही बातमी वाचा.   

6/7

वायर तुटण्याचा संभाव्य धोका

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

8 जून 2021 ते 28 जून 2023 पर्यंत तयार करण्यात आलेल्या 1,08,306 एक्सयूवी700 मध्ये हा बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. जिथं घर्षणामुळं वायर तुटण्याचा संभाव्य धोका पाहता या कार परत मागवल्या आहेत.   

7/7

खर्चही कंपनीच करणार

Mahindra Recall 1 Lakh Xuv700 know the reason auto news

दरम्यान, 16 फेब्रुवारी 2023 ते 5 जून 2023 पर्यंत तयार करण्यात आलेल्या 3,560 एक्सयूवी400 सुद्धा कंपनीनं परत मागवल्या आहेत. वाहनांमध्ये बिघाड आढळल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची असून, त्यासाठीचा खर्चही कंपनीच करणार आहे.