Mahindra Thar च्या 5 door मॉडेलचा फर्स्ट लूक पाहून कारप्रेमी क्लिनबोल्ड; तुम्हीही फिचर्स पाहून घ्या

Mahindra Thar e First Look : अशा या महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या THAR या बहुचर्चित मॉडेलचं इलेक्ट्रीक वर्जन लाँच करण्यात आलं आहे. तुम्ही पाहिलं का?   

Aug 17, 2023, 14:44 PM IST

Mahindra Thar e First Look Review : महिंद्राच्या कार म्हटलं की त्यांचा एकंदर आकार, डिझाईन आणि कारचे फिचर्स म्हणजे शहरातील ड्रायव्हिंसोबतच ऑफरोडिंगसाठीचा एक अफलातून अनुभव. 

 

1/7

Mahindra Thar e

Mahindra Thar e First Look Review auto news

Mahindra Thar e चा First Look नुकताच सर्वांच्या भेटीला आला आहे. या कारमध्ये नेमके काय फिचर्स आहेत हे एकदा पाहूनच घ्या. कारण, या कारची पहिलीच झलक पाहून सर्वजण घायाळ झाले आहेत.   

2/7

INGLO प्लॅटफॉर्म

Mahindra Thar e First Look Review auto news

पहिली बाब म्हणजे ही नवी थार सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या थारसारखी नाहीये. INGLO प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती करण्यात आली आहे. इलेक्ट्रीकल रेंजमध्येही ही कार अतिशय फ्लेक्जिबल आहे.   

3/7

ऑन व्हील ड्राईव्ह

Mahindra Thar e First Look Review auto news

इथून पुढं Thar.e हे मॉडेल लॅडर फ्रेम एसयुव्ही नसून एक ऑन व्हील ड्राईव्ह आणि डबल मोटर लेआऊटसोबत बाजारात येणार आहे. कारमध्ये असणारी इलेक्ट्रीक मोटर तिला टॉर्क देण्यात यशस्वी ठरेल.   

4/7

पाच दरवाजे

Mahindra Thar e First Look Review auto news

साधारण एखाद्या बॉक्सप्रमाणं दिसणारी ही कार आयताकृती असल्याचं पाहताक्षणी लक्षात येतं. नवी एलईडी लाईट, ग्रिल आणि पाच दरवाजांसह ही थार पूर्णत: नव्या रुपात पाहायला मिळतेय.   

5/7

अद्ययावत तंत्रज्ञान

Mahindra Thar e First Look Review auto news

अद्ययावत तंत्रज्ञानासह या कारमध्ये असंख्य इंटीरियर फिचर्स देण्यात आले आहेत. शाश्वत विकास केंद्रस्थानी ठेवत या कारच्या निर्मितीसाठी अनेक प्रकारचं रिसाइकिल्ड मटेरियल वापरण्यात आलं आहे.   

6/7

आतापासूनच Saving सुरु करा

Mahindra Thar e First Look Review auto news

फर्स्ट लूक लाँच झालं असलं तरीही थारचं हे मॉडेल इतक्यात बाजारात येणार नाहीये. 2027 पर्यंत ते विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळं ही कार घ्यायची असेल तर आतापासूनच Saving सुरु करा.   

7/7

थार E

Mahindra Thar e First Look Review auto news

कारण अद्वितीय ड्रायव्हिंगचा अनुभव देणारी अशी 'थार' पुन्हा होणे नाही.