पुण्यात २०० झोपड्या आगीत खाक
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली.


