मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप! का तुटलं 5 वर्षांचं नातं?

Malaika Arora Arjun Kapoor Breakup: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा होत होती. 

Pravin Dabholkar | May 31, 2024, 15:35 PM IST
1/11

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप! का तुटलं 5 वर्षांचं नातं?

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

Malaika Arjun: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा होत होती. 

2/11

सुंदर नात्यात

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

दोघेही लवकरच लग्न करु शकतात, असे म्हटले जात होते. कारण अनेक वर्षांपासून ते चांगल्या आणि सुंदर नात्यात होते. 

3/11

आवडते कपल

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

अनेकदा डिनरवेळी दोघे एकत्र दिसायचे. त्यामुळे बॉलिवूडचे ते एक आवडते कपल बनू लागले होते. अशात दोघांनीही आपलं नातं आदरपूर्वक संपवल्याची बातमी समोर येत आहे.

4/11

अत्यंत सामंज्यस्याने घेतलेला निर्णय

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त मीडियातून समोर येत आहे. असे असले तरी दोघांमधील संबंध दुरावललेले नाहीत. जो काही निर्णय झालाय तो दोघांनी मिळून अत्यंत सामंज्यस्याने घेतलाय असे म्हटले जात आहे.  

5/11

हृदयात नेहमीच खास स्थान

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

मलायका आणि अर्जुनचे नाते खूप खास होते. दोघांनाही एकमेकांच्या हृदयात नेहमीच खास स्थान होते. दरम्यान त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून याप्रकरणी ते कुठे जास्त वाच्यता करणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांना आपल्या नात्याची प्रसिद्धी करण्याची संधी कोणालाही द्यायची नाहीय.

6/11

कोणत्याही प्रकराचे खटके उडाले नाही

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

मीडिया रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुनमध्ये कोणत्याही प्रकराचे खटके उडाले नाहीत. ते एकमेकांचा खूप आदर करतात आणि एकमेकांसाठी मजबूत खांबासारखे उभे आहेत. वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही ते एकमेकांचा आदर करत राहतील. 

7/11

कोणतीही वाईट भावना नसेल

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्या नात्याला खूप जपले. एकमेकांना त्यांचा स्पेस दिला. एकमेकांचा आदर केला. आता वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही या नात्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही वाईट भावना नसेल असे सांगण्यात येतंय.  या भावनिक काळात लोक त्यांना त्यांची स्पेस देतील असे विश्वास त्यांना आहे. 

8/11

रिलेशनशीपच्या बातम्या 2018 मध्ये सुरु

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

अर्जुन आणि मलायका यांच्यात रिलेशनशीपच्या बातम्या 2018 मध्ये सुरु झाल्या होत्या. एका फॅशन शो कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले होते. 

9/11

नात्याच्या वृत्ताला दुजोरा

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

मलायकाच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.  

10/11

'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुन कपूर

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

यानंतर दोघेही एकमेकांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू लागले. काही दिवसांपुर्वी 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुन कपूर आला होता. त्यावेळी त्याने आपले रिलेशनशीप पुढे नेण्याच्या प्लानबद्दल सांगितले होते. 

11/11

जगातील सर्वात मोठा खजिना

Malaika arora arjun kapoor breakup reason bollywood Relationship Marathi News

मलायका अरोराने आज 31 मे रोजी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, या जगातील सर्वात मोठा खजिना ते लोक आहेत जे आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्याला पाठींबा देतात. त्यांची जागा घेतली जाऊ शकत नाही. ना विकत घेतले जाऊ शकते. आम्ही त्यापैकी एक आहोत.