भूत बनून रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री, पण 22 वर्षांपासून आहे गायब? ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पडद्यावर येताच खळबळ उडवून दिली आणि रातोरात प्रसिद्धीही मिळवली. 

| Jan 17, 2025, 12:36 PM IST
1/7

पहिलाच चित्रपट

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटाने लोकांना आश्चर्यचकित केले आणि नंतर अचानक गायब झाल्या.  

2/7

रातोरात प्रसिद्धी

आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत,  जिने पहिल्याच हॉरर चित्रपटात साईड रोल करून रातोरात प्रसिद्धी मिळवली.   

3/7

मालिनी शर्मा

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राज' या हॉरर चित्रपटात भूताची भूमिका साकारून मालिनी शर्माला प्रसिद्धी मिळाली. तिने चित्रपटात अर्ध्या तासाची भूमिका साकारली होती.  

4/7

'राज'चे भूत

अर्ध्या तासाच्या भूमिकेत मालिनी शर्माच्या सौंदर्याने लोकांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपटानंतर लोक मालिनीला 'राज'चे भूत म्हणून ओळखत होते. 

5/7

डायलॉग

'राज' चित्रपटात बिपाशा बसु मुख्य भूमिकेत दिसली असली तरी मालिनी शर्माची देखील खूप चर्चा झाली होती. तिचा एकही डायलॉग आजपर्यंत लोक विसरू शकले नाहीत. 

6/7

बॉलिवूडला अलविदा

पहिल्याच चित्रपटाने चर्चेत आलेल्या मालिनी शर्माने फक्त एकच चित्रपट करून बॉलिवूडला अलविदा केले. त्यानंतर मालिनी शर्माने प्रियांशू चॅटर्जीशी लग्न केले. 

7/7

घटस्फोट

मात्र, हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही आणि लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यामुळेच ती चित्रपटांपासून दूर झाली.