दैत्याचं स्वयंपाकघर; एक असा खड्डा, जिथं गेलेला कधीच परत येत नाही, मग 'तो' वाचला कसा?

Manjummal Boys real life story Guna Cave photos : सत्य घटनेवर आधारित चित्रपटानं या मल्याळम चित्रपटानं केली 200 कोटींची कमाई. 'कांतारा'ला टक्कर देणारा हा चित्रपट तुम्ही पाहिला? कुठंय हे रक्त गोठवणारं, भयावह ठिकाण?   

Jun 03, 2024, 15:27 PM IST

Manjummal Boys real life story Guna Cave photos : भटकंतीची आवड सर्वांनाच असते. पण, अनेकदा ही भटकंती आपल्याला असे अनुभव देऊन जाते की, काही कळायच्या आधीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. 

1/7

मंजुमल बॉईज

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

Manjummal Boys real life story Guna Cave photos : असाच एक अनुभव, एक सत्य घटना नुकतीच रुपेरी पडद्यावर साकारण्यात आली. जिथं एका सत्य घटनेचा आधार घेत दिग्दर्शक चिदंबरम यानं असं कथान प्रेक्षकांपुढे मांडलं, की सारेच हैराण झाले. अवघ्या 20 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चामध्ये साकारण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे, 'मंजुमल बॉईज'. 

2/7

विक्रमी कमाई करणारा चित्रपट

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

200 कोटींची कमाई करणारा Manjummal Boys हा चित्रपट मल्ल्याळम कलाविश्वातील पहिला विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला. 2006 मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर या चित्रपटाचं कथानक आधारित होतं.   

3/7

मृत्यूशी गाठ

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

केरळच्या एर्नाकुलम येथील रहिवासी असणारा सुभाष नामक तरुण, कोडईकनाल येथील गुना गुहेत पडला आणि इथं त्यानं मृत्यू अतिशय जवळून पाहिला, अंतच नसणाऱ्या या गुहेमध्ये पडलेल्या आणि एका खडकावर अडकलेल्या सुभाषला वाचवण्यासाठी त्यावेळी त्याचा मित्र सिजू डेव्हिड यानं गुहेत जात बचावकार्यात मोठी मदत केली आणि त्यानंतर हा घडला प्रकार माध्यमांसमोर आला.   

4/7

दैत्याचं स्वयंपाकघर

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

सुभाष आजही आपल्याला मिळालेलं हे आयुष्य म्हणते मित्राची कृपाच समजतो. दैत्याचं स्वयंपाकघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुना केव भागात असंख्य लहानमोठ्या गुहा आहेत. 

5/7

अधिकृत आकडेवारी

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

अधिकृत आकडेवारीनुसार इथं जवळपास 13 ते 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मित्राचा जीव वाचवणाऱ्या सिजू डेव्हिड याला 2008 मध्ये जीवन रक्षा पदक पुरस्कार देत गौरण्यात आलं होतं. 

6/7

गुना

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

गुना गुहेला कमल हासन यांच्या 1991 मधील 'गुना' या चित्रपटानंतर हे नाव मिळालं होतं. 1821 मध्ये ब्रिटीश अधिकारी बी.एस.वॉर्ड यांनी या साधारण 2230 मीटर उंचीवर असणाऱ्या गुहेचा शोध लावला होता. या गुहेची खोली नेमकी किती आहे, यासंदर्भातील अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. 

7/7

कोडईकनाल

Manjummal Boys real life story Guna Cave photos of Devils Kitchen in Kodaikanal

कोडईकनालमधील या ठिकाणासंदर्भात अनेक गुपितं सांगितली जातात. इथं घडलेल्या प्रसंगाची माहिती देण्यातत येते. त्यात भरीस भर म्हणजे, 'मंजुमल बॉईज' या चित्रपटामुळं हे ठिकाण पर्यटकांच्या नजरेत आलं आणि इथं येणाऱ्यांची संख्या दुपटीनं वाढली. हो पण, दैत्याच्या या धडकी भरवणाऱ्या स्वयंपाकघरापाशी अर्थात त्या जीवघेण्या गुहेपाशी मात्र जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.