'Matter'नं सादर केली 'गियर' असलेली इलेक्ट्रिक बाइक, पूर्ण चार्जवर कापणार इतकं अंतर

Electric Bike: टेक्नॉलॉजी स्टार्टअप 'Matter'नं गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर केली आहे. गुजरातस्थित कंपनी लवकरच बुकिंग सुरू करणार आहे. कंपनीनं पुढील वर्षी एप्रिलपासून डिलिव्हरी सुरू करण्याची योजना आहे.

Nov 22, 2022, 18:40 PM IST
1/5

Matter Electric Motorcycle

स्टार्टअप कंपनीने पुढील एका वर्षात देशातील प्रमुख शहरांमध्ये 200 डीलरशिप केंद्रे सुरू करणार आहे. तसेच येत्या दोन वर्षांत आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील विविध बाजारपेठांमध्ये निर्यात करण्याकडे लक्ष देत आहे.

2/5

Matter Electric Motorcycle

कंपनीनुसार, ही बाईक एका चार्जवर 125 ते 150 किलोमीटर अंतर कापते. ही बाइक साध्या पाच अँपिअर प्लगने चार्ज करता येते.

3/5

Matter Electric Motorcycle

कंपनीचा दावा आहे की, ही देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाइक आहे. ताशी पाच किलोवॅट वीज क्षमतेसह अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

4/5

Matter Electric Motorcycle

ही बाइक मॅन्युअल गियरबॉक्ससह आणली गेली आहे. यात 4-स्पीड गियरबॉक्स आणि एबीएसचीही सुविधा आहे.

5/5

Matter Electric Motorcycle

मॅटर ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मोहल लालभाई यांनी सांगितले की, कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटर्स बनविण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इतर कंपन्यांसह पोकळी भरून काढण्याची योजना करत आहे.