Praveen Sood: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचे सासरे बनले CBI चे नवे डायरेक्टर!

Mayank Agarwal father in law: प्रवीण सूद यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे एका प्रसिद्ध क्रिकेटरचे सासरे.

| May 14, 2023, 23:47 PM IST

CBI director Praveen Sood: कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचे (New CBI director) पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रवीण सूद (CBI director) यांच्या नावावर मोहर लावण्यात आली आहे.

1/5

नुकतंच कर्नाटकची निवडणूक झाल्यानंतर आता अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात बदली होताना दिसत आहे. कर्नाटकचे डीजीपी म्हणून ओळख असलेल्या प्रवीण सूद यांना बढती देण्यात आली आहे. सीबीआयचे संचालक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलंय.

2/5

आमचे डीजीपी हे त्यांच्या पदासाठी योग्य नाहीत. ते तीन वर्षे डीजीपी आहेत, पण भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करतात. त्याच्यावर एफआयआर दाखल व्हायला हवा, असं डी के शिवकुमार म्हणाले होते.

3/5

आयआयटी दिल्लीतून पदवीधर झालेले सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्याचसोबत प्रवीण सूद यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे एका प्रसिद्ध क्रिकेटरचे सासरे... टीम इंडियामध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरचे सासरेबुवा!!  

4/5

प्रवीण सूदची मुलगी आशिता सूद हिने भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवालसोबत लग्नगाठ बांधली आहे. 7 वर्षापासून आशिता आणि मयंक यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर 4 जून 2018 रोजी लग्न केलं.

5/5

दरम्यान ,मयंक आणि आशिता शालेय जीवनापासून चांगले मित्र होते. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  मयंकने लंडनमध्ये आशिताला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघांनी निर्णय घरी कळवला होता. घरच्यांची परवानगी मिळाल्यानंतर दोघांनी सुखी संसार सुरू केला.