मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेत; ६ किलोमीटरची चाचणी पूर्ण
लवकरच पुण्यात धावणार मेट्रो
पुणे : पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४५ % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट , स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. १० जानेवारी २०२० रोजी पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती.
1/5
2/5
दुपारी १ वा ३० मी मेट्रो ट्रेन PCMC स्थानकावरून सुटली व दुपारी २ वा फुगेवाडी या स्थानकावर पोहोचली. आजच्या चाचणीसाठी श्री डी डी मिश्रा, कार्यकारी संचालक, श्री रवी कुमार, मुख्य प्रकल्प अभियंता, संदीप साकले, श्रीराम मांझी,राजा रमण, रवी टाटा या मेट्रोचे अधिकारी यांनी अथक परिश्रम केले. श्री चेतन फडके या ट्रेन ऑपरेटर ने ही ट्रेन चालविली.
3/5
या चाचणीसाठी ओएचई (OHE) तारा २५ के.व्ही विद्युत भाराने सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत प्रभावित केल्या होत्या. विद्युत तारांची तंदुरुस्ती तसेच ६ किमी रेल्वे रूळ (ट्रॅक) त्याची सुरक्षेतेच्या दृष्टीने निरीक्षण अश्या अनेक बाबींची पूर्तता करून आजची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली. पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे.
4/5
या चाचणीसाठी ३ कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी अनेक दिवसांपासुन झटत होते. पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन (RDSO), कमिशनवर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असुन चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे.
5/5