पूर-पावसामुळे आता होणार नाही रस्त्यांचे नुकसान; नितीन गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन!

देशात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था कोणापासून लपून राहिलेली नाही. रस्त्यांवरील खड्डे आणि रस्ता वाहून गेल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात.  मात्र या समस्येतून सुटका करण्यासाठी सरकार आता एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. अतिवृष्टी आणि पुराचा सामना करण्यासाठी असे रस्ते प्रभावी ठरतात.  

Jul 28, 2023, 17:45 PM IST
1/7

मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Big announcement by Minister Nitin Gadkari

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. गडकरी यांचे मंत्रालय यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करणार आहे

2/7

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

NHAI

याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) काही भाग काँक्रिटचे बनविण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून या योजनेची चाचणी घेता येईल.

3/7

तडे गेलेल्या रस्त्यांचे होणार कॉक्रिटीकरण

cracked road will be concretized

सरकार अशा रस्त्याचे काँक्रीटकरन करण्याचा विचार करत आहे. अशा रस्त्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा सामना करण्याची क्षमता असते.

4/7

काँक्रीट रस्त्यांची चाचणी

Testing of Concrete Roads

ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती अधिक वेळा येतात, त्या ठिकाणी काँक्रीट रस्त्यांची चाचणी करून त्याची क्षमता पाहणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते, पूल आणि बोगदे बांधायला हवेत जे अतिवृष्टी आणि भूस्खलन सहन करण्यास सक्षम असतील असे नितीन गडकरी म्हणाले.

5/7

मंत्रालय पाहणार काम

Concrete roads

"काँक्रीटचे रस्ते किफायतशीर करावे लागतील कारण यामध्ये सिमेंटचा वापर केला जाणार असल्याने त्याची किंमत वाढू शकते. त्यासाठी संशोधन करून नंतर लोकांना प्रशिक्षित करावे लागेल. हे काम पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे एक संस्था असेल. यासाठी सरकार आयआयटी संस्थांसोबत जवळून काम करेल. काँक्रीट रस्त्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा काय आहे हेही मंत्रालय पाहणार आहे," असेही नितीन गडकरी म्हणाले.

6/7

100 वर्षे रस्त्यांना पडणार नाहीत खड्डे

road audit

सरकार आता काँक्रीटचे रस्ते बांधत आहेत ज्यावर पुढील 100 वर्षे खड्डे पडणार नाहीत.आर्थिक लेखापरीक्षणाप्रमाणेच रस्त्यांच्या बांधकामाचेही ऑडिट केले जात आहे, जेणेकरून रस्ते सुरक्षा सुनिश्चित करता येईल, असे नितीन गडकरी काही वर्षांपूर्वी म्हणाले होते.

7/7

देशभरात रस्ते गेले वाहून

Roads across the country were washed away

खरे तर गेल्या काही महिन्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे डोंगराळ भागात, विशेषतः उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. यासोबतच मैदानी भागात पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत किंवा खराब झाले आहेत. (सर्व फोटो - PTI)