तुमचा मोबाईल डेटा लवकर संपतो का? फॉलो करा या टिप्स डेटा संपणारच नाही
डेटा लवकर संपतो अशी तुमची तक्रार असेल आणि मोबाईल डेटाचा कमीत-कमी वापर करून पूर्ण काम करायचे असेल तुम्हाला त्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या सविस्तर.
आजकाल वर्क फ्रॉम होम मुळे लोक घरून काम करत आहेत. अशात, साहजिकच डेटाची अधिक आवश्यकता भासते. घरी वाय-फाय असेल तर ठिक. पण, जे लोक कामासाठी मोबाईल डेटा वापरत्तात. त्यांचा डेटा यामुळे लवकर संपतो. अशात मोबाइल डेटा सेव्ह करत त्याचा वापर कमीत-कमी कसा करायचा याकरिता तुम्ही काही टिप्स वापरू शकता. असे अनेक डेटा प्लॅन आहेत जे दररोज 3GB डेटा ऑफर करतात, परंतु जास्त वापरामुळे, हे देखील दिवसभर टिकत नाही.