चक्क मोठ्या कपाळाची सर्जरी, ५ लाख खर्च करून कपाळ केलं छोटं

कपाळ मोठं होतं म्हणून केली सर्जरी 

Mar 17, 2021, 09:19 AM IST

मुंबई : महिला आपल्या सुंदरतेबाबत अधिक दखल घेत असतात. अगदी सुदंर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांपासून ते प्लास्टिक सर्जरीपर्यंत काहीही करायला महिला तयार असतात. अशीच एका महिलेने चक्क आपल्या मोठ्या कपाळाची सर्जरी केली आहे. 

1/7

या महिलेला आपलं कपाळ म्हणजे Forehead अतिशय मोठं वाटतं होतं. ज्याकरता तिने तब्बल 5 लाख रुपये खर्च करून सर्जरी करून घेतली

2/7

या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डॉक्टरांनी सर्जरी करून महिलेचं कपाळ तीन सेमीने कमी केलं आहे. 

3/7

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कॅमिला कोलेमॅन ब्रूक्स नावाची महिला अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहते.

4/7

 तिच्या कपाळाची उंची 8.5 सेमी होती. सर्जरी करून तिने ते 3 सेमीने कमी केलं आहे. अमेरिकेतील महिलेच्या कपाळाची उंची 6 सेमी असते. 

5/7

कॅमिला दोन मुलांची आई आहे. कपाळ मोठं असल्यामुळे तिला आपला चेहरा आवडत नसल्याचं तिने म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून ती या चिंतेत आहे.

6/7

जवळपास दीड तास ही सर्जरी चालत होती. डॉक्टरांनी महिलेच्या हेअरलाइनला सरकवलं आहे. ज्यामुळे तिचं कपाळ 3 सेमीने कमी झालं आहे. डॉक्टरांनी महिलेच्या स्कीनचा एक भाग कमी करून टाकला आहे. 

7/7

कॅमिला म्हणते की, सर्जरी केली म्हणून मी आनंदी आहे असं नाही. पण आता मला माझा चेहरा अतिशय आवडतोय.