देशातील सर्वात महागडा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रात; 3 वर्षांमध्ये वाढतो 18% टोल; पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणे म्हणजे स्वर्गसुख

Most Expensive Expressway in India : आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या एक्स्प्रेसवेबद्दल सांगणार आहोत. विशेष म्हणजे हा देशातील पहिला एक्स्प्रेस वे असून तो महाराष्ट्रात आहे. 

| Nov 26, 2024, 22:59 PM IST
1/8

देशातील पहिला हाय-स्पीड एक्स्प्रेस वे हे भारतातील पायाभूत सुविधांचे उत्तम उदाहरण असलेला हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातील दोन प्रमुख्य शहरांना जोडतो. या एक्स्प्रेस वे वरुन दररोज लाखो गाड्या ये जा करतात. 

2/8

आम्ही बोलतो आहोत, 2002 पूर्णपणे तयार झालेला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बद्दल. 94.5 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग नवी मुंबईतील कळंबोली ते पुण्यातील किवळेपर्यंत जातो. या एक्स्प्रेस वे मुळे मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास अडीच तासावर आला आहे.  

3/8

हा द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) बांधला आहे. त्याच्या उभारणीत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा होता. याची एकूण किंमत ₹ 1,630 कोटी होती.

4/8

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल दर दरवर्षी 6% वाढतो आणि दर तीन वर्षांनी 18% ने वाढविला जातो. शेवटचा टोल बदल एप्रिल 2023 मध्ये झाला होता, ज्यामध्ये कारसाठी टोल ₹270 वरून ₹320 करण्यात आला होता. 

5/8

मिनीबस आणि टेम्पोचा टोल ₹ 420 वरून ₹ 495 पर्यंत वाढला, तर 2 एक्सल ट्रकचा टोल ₹ 585 वरून ₹ 685 पर्यंत वाढला. बसचा टोल ₹797 वरून ₹940 पर्यंत वाढला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील टोल सुधारणा 2026 मध्ये होईल आणि हे दर 2030 पर्यंत स्थिर राहतील.

6/8

या एक्स्प्रेस वेवर दोन कॅरेजवे आहेत आणि प्रत्येकी तीन काँक्रीट लेन असून एकूण 6 बोगदे आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणे सुखद आणि नयनरम्य अनुभव असतो. दोन्ही बाजूने हिरवळ, पावसाळ्यात छोटे छोटे असंख्य धबधबे, हिवाळ्यात ढगातून प्रवास करतोय असा अनुभव. 

7/8

या एक्स्प्रेसवर गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. खास करुन वीकेंडला म्हणजे शनिवार अन् रविवारी या एक्स्प्रेस वेवरून साधारण 80 ते 90 हजारांवर गाड्या प्रवास करतात. त्यामुळे विकेंडला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

8/8

ही वाहतूक कोंडी घालविण्यासाठी पुणे-मंबई एक्स्प्रेस-वेवर आठ लेन तयार करण्यात येणार आहे. सध्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर सध्या सहा लेन आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जागा संपादित केली गेली आहे. तसंच बोगदा, पूल अशी कामं करण्यात येत आहेत. यासाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च होणार आहे, असं सांगण्यात आलंय.