SBI-PNB की HDFC, कोणत्या बॅंकेत 4 लाखाची एफडी केल्यानं जास्त पैसे मिळणार?

अनेक बॅंक या त्यांच्याकडून स्पेशल एफडी स्कीम देतात. स्पेशल एफडी ती असते ज्यात तुम्ही काही विशिष्ठ काळासाठी गुंतवणूक करतात आणि नॉर्मल एफडीच्या तुलनेत त्यात जास्त व्याज मिळवतात. त्यातून काही एफडी स्कीम या एसबीआयच्या अमृत ​​वर्ष, बॅंक ऑफ बडोदाची बीओबी उत्सव आणि इतर काही इतर सहभागी आहे. स्पेशल एफडीशिवाय, रेग्युलर इनकम एफडी, सीनियर सिटीजन एफडी, फ्लेक्सी डिपॉजिट एफडी, कॉर्पोरेट एफडी आणि टॅक्स सेव्हिंग एफडी देखील सहभागी आहे. 

Diksha Patil | Jan 23, 2025, 18:43 PM IST
1/7

स्पेशल एफडीमध्ये जर तुम्ही काही ठरावीक काळानंतर पैसे काढले नाही तर तुम्हाला साधारण एफडीच्या तुलनेत जास्त व्याज मिळेल. आता या कोणत्या स्पेशल एफडी स्कीम आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

2/7

स्पेशल एफडी स्कीममध्ये एसबीआयकडून सीनियर सिटीझनला 7.75 टक्क्यांमध्ये व्याज देण्यात येतं. तर इतरांना 7.25 टक्के व्याज मिळतं. जर कोणताही सीनियर सिटीझन अमृत वृष्टी योजनेत 4 लाखाची गुंतवणूक करतात तर त्यांनी मच्योरिटीवर 4,39,718 रुपये मिळणार आहेत. तर इतरांना 4,37,064 रुपये मिळणार. त्याचा कालावधी हा 444 दिवसांचा असतो. 

3/7

बॅंक ऑफ बडोदाच्या स्पेशल एफडी स्कीममध्ये सीनियर सिटीझनला 7.80 टक्क्यांनी व्याज मिळतं. तर इतरांना 7.30 टक्के व्याज दर मिळतं. त्याचं टेन्युर 400 दिवसाचं आहे. जर कोणताही सीनियर सिटीझन बीओबी उत्सव योजनेत 4 लाखांची गुंतवणूक करत असेल तर मच्योरिटीवर 4,35,850 रुपये मिळतील तर बाकीच्यांना 4,33,479 रुपये मिळतील. 

4/7

पंजाब नॅशनल बॅंक या स्पेशल एफडी स्कीममध्ये सीनियर सिटीझनला 7.75 टक्के व्याज मिळतं. तर इतरांना 7.25 टक्के व्याज मिळतं. या योजनेत पैसे हे 400 दिवसांसाठी जमा करतात. जर कोणी सीनियर सिटीधन पीएनबीच्या या एफडी स्कीममध्ये 4 टक्क्यांची गुंतवणूक करत असेल तर त्याना 400 दिवसांनंतर 4,35,612 रुपये आणि इतरांना 4,33,243 रुपये मिळतील. 

5/7

एचडीएफसी बॅंकच्या स्पेशल एफडी स्कीममध्ये सीनियर सिटीझनला 7.90 टक्के व्याज मिळतं. जर कोणी सीनियर सिटीझन एचडीएफसीच्या या एफडी स्कीममध्ये 4 लाख रुपये लावले तर त्यांच्या मच्योरिटीवर 5,72,503 रुपये मिळणार. तर इतरांना 5,59,773 रुपये मिळणार. 

6/7

कॅनरा बॅंक स्पेशल एफडी स्कीममध्ये सीनियर सिटीझनला 7.90 टक्के व्याज देतं. तर इतर लोकांना 7.40 टक्के व्याज मिळतं. कोणत्याही सीनियर सिटीझननं या योजनेत 4 लाख रुपये 3 वर्षांसाठी जमा केले, तर त्यांना 5,05,807 रुपये मिळतील. तर दुसऱ्यांना 4,98,416 रुपये मिळतील. 

7/7

एक्सिस बॅंकच्या स्पेशल एफडी स्कीममध्ये सीनियर सिटीझनला 7.75 टक्के व्याज मिळतं. तर दुसऱ्या लोकांना 7.25 टक्के व्याज मिळतं. जर कोणी सीनियर सिटीझन या योजनेत 4 लाख दोन वर्षांसाठी जमा केले तर त्यांना 4,66,371 रुपये मिळतील. दुसऱ्या लोकांना 4,61,816 मिळतील.