सीरियलसाठी निर्मात्यांनी 'या' अभिनेत्रीला हॉटेलमध्ये केलेलं बंद; विद्युत जामवालची होती गर्लफ्रेंड, करण ओबेरॉयसोबतही जोडलेलं नाव

Entertainment : ही अभिनेत्री एका टीव्ही मालिकेतून रातोरात प्रसिद्ध झाली. आज तिचा 43 वा वाढदिवस असून अभिनेता विघुत जामवालसोबत रिलेशनशिपमध्ये होती हे खूप कमी लोकांना माहितीये. 

Oct 08, 2024, 11:41 AM IST
1/8

'जस्सी जैसी कोई नहीं' हा टीव्ही शोमधून ती लाखों चाहत्यांचा हृदयावर राज्य करु लागली. ऑन एअर जाताच ती घरोघरी पोहोचली. तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते. 

2/8

अभिनेत्री मोना सिंग हिचा आज वाढदिवस असून टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत तिने मजल मारलीय. जस्सीच्या भूमिकेसाठी मोनाने दोन इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार जिंकले.

3/8

मालिकाच नाही तर मोनाने 3 इडियट्स, क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो आणि कवच...काली शक्ती से यांसारख्या चित्रपटांमध्येही काम दमदार अभिनय केला. हल्लीच येऊन गेलेला लाल सिंह चड्ढा या चित्रपटात ती झळकली होती. 

4/8

2013 मध्ये मोना सिंग एक बनावट एमएमएस लीक झाल्यामुळे चर्चेत आली होती. मोनाची प्रतिमा बऱ्यापैकी स्वच्छ आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांना या घोटाळ्याचा धक्का बसला होता. मात्र, नंतर सायबर पोलिसांनी हा व्हिडीओ बनावट आणि एडिट झाल्याची स्पष्ट केलं होतं. 

5/8

मोना सिंग ही फक्त एक उत्कृष्ट अभिनेत्री नाही तर ती खूप चांगली डान्सर आहे. ती झलक दिखला जा सीझन 1 ची विजेती ठरली. नंतर तिने त्याच शोचे सीझन 3 आणि 4 होस्ट केलं होतं .

6/8

फार कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेत्री मोना सिंह आणि विद्युत जामवालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर दोघेही काही कारणामुळे वेगळे झाले. त्यानंतर तिचं नाव बँड ऑफ बॉईजचा गायक करण ओबेरॉयसोबतही जोडलं गेलं होतं. 

7/8

शीख कुटुंबात जन्मलेल्या, मोनाचे वडील लष्करी अधिकारी होतं. 27 डिसेंबर 2019 ला अभिनेत्रीने एका पारंपारिक शीख समारंभात चित्रपट निर्माता श्याम राजगोपालनशी लग्न केलं. 

8/8

2018 मध्ये, मोनाने डिजिटल जगात प्रवेश करत कमाल केली. 'द व्हायरल फीव्हर' आणि नेटफ्लिक्स सीरिज 'ये मेरी फॅमिली' तून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.