अलिबाग जवळील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ तब्बल चार महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले; इथं जाण्यासाठी होडीशिवाय पर्याय नाही

मुरूड जंजीरा किल्ला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

वनिता कांबळे | Oct 07, 2024, 22:15 PM IST

Murud Janjira Fort  : अलिबाग जवळील मुरूड जंजीरा किल्ला हाजगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. चार महिन्यानंतर हे पर्यटनस्थळ  पर्यटकांसाठी खुले झाले आहे. 

1/7

 मुरूड जंजीरा किल्ला हा अजिंक्य किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न केले.  आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने  शक्य झालेले नाही.    

2/7

अखेर चार महिन्यानंतर येथील जलवाहतूक सुरु झाली आहे.  राजपुरी जेटी, खोरा बंदर, दिघी बंदरातून या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवासी वाहतूक केली जाते.  

3/7

पावसाळ्याच्या दिवसात किल्ल्यात प्रवेश बंदी केली जाते. किल्ल्याकडे जाणारी प्रवासी जलवाहतूक थांबवण्यात येते.यंदा 26 मे पासूनच किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. 

4/7

समुद्रात मोठ्या दिमाखात उभा असेलला हा भव्य किल्ला किनाऱ्यावरुनच पर्यटकांना आकर्षित करतो. किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी शिडाची होडी हाच एकमेव पर्याय आहे. 

5/7

अलिबागच्या मुरुड बेटावर  मुरूड जंजीरा किल्ला बांधण्यात आला. 22 एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. समुद्र किनाऱ्यापासून मुरुड-जंजिरा किल्ला 90 फुट उंचीवर आहे. 

6/7

बंदरावर उतरल्यावर शिडाच्या होडीने किल्ल्यावर जावे लागते. होडीतून प्रवास करताना किल्ला जस जसा जवळ येतो तसचं किल्याची भव्यता अगदी स्पष्टपणे दिसू लागते. 

7/7

मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा भव्य किल्ला बांधण्यात आला आहे. हा किल्ला अलिबागला फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.