रिंकू सिंहने बांधला 3.5 कोटींचा आलिशान बंगला, पण आई वडील अजूनही जुन्याच घरात का राहतायत?

Rinku Singh : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह त्याच्या परफॉर्मन्समुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 27 वर्षांचा युवा क्रिकेटर गरीब कुटुंबातून आला असून अतिशय कष्टाने त्याने क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिंकूने आलिशान बंगला खरेदी केला. परंतु अजूनही त्याचे आई वडील गावातील जुन्याच घरात राहत आहेत.   

Pooja Pawar | Jan 22, 2025, 16:50 PM IST
1/7

रिंकू सिंहने भारताकडून टी 20 आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. तर 2018 पासून रिंकू हा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. आयपीएल 2025 साठी देखील रिंकूला केकेआरने 13 कोटींना रिटेन केले.  

2/7

रिंकूचा जन्म उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथील छोट्याश्या गावात झाला असून त्याचे वडील हे सिलेंडर डिलिव्हरीचे काम करायचे तर आई गृहिणी आहेत. दोन खोल्यांच्या घरात रिंकू आणि त्याचे 5 भावंडं आईवडिलांसोबत राहायचे. रिंकूच्या बालपणी त्यांच्या घरची आर्थिक स्थिती खूपच बेताची होती, त्यामुळे रिंकूला काहीवेळा हॉटेलमध्ये लादी पुसण्याचे काम सुद्धा करावे लागले. रिंकूला क्रिकेटचे वेड होते. नववीत नापास झाल्यावर रिंकूने शाळा सोडली. क्रिकेट मॅच खेळून जे पैसे मिळायचे ते तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई वडिलांकडे द्यायचा. 

3/7

नोव्हेंबर महिन्यात अलीगढमधील ओझोन सिटी येथील गोल्डन इस्टेटमध्ये रिंकू सिंहने आलिशान घर खरेदी केलं. रिंकू सिंगचे नवीन घर ५०० स्क्वेअर यार्डचे असून याची किंमत सुमारे 3.5 कोटींच्या घरात आहे. घराची नोंदणी झाल्यावर रिंकूने आई वडिलांसह नव्या घराची चावी स्वीकारली होती. 

4/7

मुलाने आलिशान घर खरेदी केल्यावर आई वडील कुटुंबासह नव्या घरात शिफ्ट होतील असं म्हटलं जात होतं मात्र रिंकूचे आईवडील अजूनही गावातील त्यांच्या जुन्याच घरामध्ये राहत आहेत. 

5/7

न्यूज 18 हिंदीने रिंकूच्या आई वडिलांची यावर प्रतिक्रिया घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना साधे जीवन जगायला आवडते. पैसा आणि आरामापेक्षा त्यांना त्यांची मूल्य आणि मूळ जास्त महत्वाची वाटतात.  

6/7

रिंकू सिंहच्या वडिलांनी बोलताना म्हटले की त्यांचं कुटुंब ही त्यांची प्रेरणा आहे. मुलांना वाढवताना त्यांनी कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही, मग भलेही त्यांची आर्थिक स्थिती खूप वाईट होती. याच कारणामुळे रिंकूही तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप प्रेम करतो.  

7/7

सध्या रिंकू सिंहच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज हिच्याशी रिंकूचा साखरपुडा झाला असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.