अवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती

Weather Monsoon News : या साऱ्यामध्ये येत्या काळात मान्सूनवर अवकाळीचा मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   

May 10, 2023, 12:32 PM IST

Weather Monsoon News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच वाऱ्यांच्या बदलणाऱ्या दिशा आणि पश्चिमी झंझावातामुळंही राज्यातील हवामानावर परिणाम होताना दिसत आहेत. 

1/7

मान्सून

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

ऐन उन्हाळ्यात पावसाचा मारा होत असल्यामुळं काही दिवसांनी मार्गस्थ होणाऱ्या मान्सूनवर याचे काय परिणाम होणार याबाबतची स्पष्ट आणि सविस्तर माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. 

2/7

अल निनो

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

जागतिक स्तरावर हवामान संस्था अल निनोच्या परिणामांसाठी तयार राहा असे इशारे देत असताना भारतातील मान्सूनवर मात्र त्याचे परिणाम होणार नसल्यामुळं शेतकरी आणि नागरिकांना चिंता करू नये असं म्हणत IMD नं दिलासा दिला आहे.   

3/7

उन्हाळ्यातच पावसाच थैमान

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

उन्हाळ्यातच पावसानं थैमान घातल्यामुलं पावसाळ्यात काय दिवस पाहावे लागणार अशी चिंता लागलेली असतानाच अवकाळी पाऊस आणि मान्सून हे वेगवेगळे विषय असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यत आलं. 

4/7

आयएमडीनं अंदाज वर्तवला

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

थोडक्यात ज्याप्रमाणं आयएमडीनं अंदाज वर्तवला आहे त्याचप्रमाणं यंदाच्या वर्षी 96 टक्के म्हणजेच सर्वसाधारण प्रमाणात मान्सूनची हजेरी पाहायला मिळेल. अल निनोच्या प्रभावातही मान्सूनचं प्रमाण घटलं नसल्याचं निकीक्षण अधोरेखित करत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली.   

5/7

चक्रीय वाऱ्यांची स्थिती

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

दरम्यान, अवकाळी पाऊस का बरसतो याचं कारण तुम्हाला माहितीये का? उन्हातच्या तीव्रतेमुळं जमीन खूप तापते. चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होते आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापलेल्या जमिनीवर ढग तयार होऊन पाऊस पडतो, तोच अवकाळी म्हणून ओळखला जातो.   

6/7

हिंदी महासागरातील सातत्यानं बदलणारं तापमान

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

अल निनो या एका घटकासोबतच हिंदी महासागरातील सातत्यानं बदलणारं तापमान, उष्णकटीबंधीय प्रदेशाचं हवामान या घटकांचाही मान्सूनवर परिणाम होतो. त्यामुळं एकट्या अल निनोनं मान्सूनवर गंभीर परिणाम होणार नाहीत हे खरं.   

7/7

मान्सूनची वाटचाल

monsoon predictions and al nino impact imd gives latest update

(सर्व छायाचित्र- स्कायमेट)