महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला कोणता? 99% उत्तरं चुकीची
Monsoon Trekking : भटकंतीविषयी बोलताना 'आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलाय...' अशी ओळख सांगता? गुगलची मदत न घेता आता द्या, या प्रश्नाचं उत्तर...
Monsoon Trekking : पावसाळा आला की अनेकांचेच पाय गडकिल्ल्यांच्या कठीण चढाईच्या दिशेनं वळतात. बहरलेला निसर्ग आणि त्यातूनच निघणारी पायवाट, कातळाच्या पायऱ्या हा सारा थरार अनुभवण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.
1/7
पावसाळी सहली

Monsoon Trekking : विषय पावसाळी सहली किंवा ट्रेकला निघालाच आहे, तर एका अशा किल्ल्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी, ज्याच्या तटबंदी आजही जैसेथे असून, त्या ऋतूचक्राच्या माऱ्यातही पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. निसर्गाच्या अगाध लीलांमध्येही हा किल्ला त्याचं वैविध्य अद्यापही जपून आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हा किल्ला उशिरानं समाविष्ट झाला असला तरीही, त्याचा उल्लेख केल्यावाचून महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा इतिहास पूर्णच होत नाही. लक्षात येतंय का या किल्ल्याचं नाव?
2/7
इतिहास

3/7
मल्हारगड

4/7
सोनेरी गाव

साधारण 1757 ते 1760 दरम्यान या किल्लाचं बांधकाम झाल्याचे संदर्भ आढळतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनेरी गावामुळं त्याला 'सोनेरी गड' असंही म्हणतात. पेशव्यांचे सरदार आणि तोफखान्याचे प्रमुख पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली असून, 1771 - 72 च्या सुमारास थोरले माधवराव पेशवे यांनी या किल्ल्याला भेट दिल्याचे संदर्भही ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतात. इंग्रजांविरोधातील बंडात वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनीही किल्ल्यात आश्रय घेतल्याचं म्हटलं जातं.
5/7
मल्हारगड

6/7
पोहोचायचं कसं?

7/7
परतीची वाट
