पाकिस्तानी या भारतीय कारचे दिवाने ! महागडा कर भरुनही ही 40 वाहने करतात खरेदी

Most Popular Cars in Pakistan: पाकिस्तानची सध्याची परिस्थिती एकदम बिकट आहे. मात्र, भारतीयांबद्दलचा त्यांचा राग कायम आहे. असे असले तरी भारतातील कारवर ते फिदा आहेत. ते इतर देशांतून भारतीय गाड्या चढ्या किमतीत खरेदी करतात. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5 कारपैकी 3 भारतीय आहेत.  

May 23, 2023, 13:00 PM IST
1/5

पाकिस्तानमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार  मारुती सुझुकीची अल्टो आहे. परवडणारी फॅमिली कार असल्याने प्रत्येक मध्यमवर्गीय पाकिस्तानी सुरुवातीला ही कार खरेदी करण्यास प्राधान्य देतो. भारतात त्याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 6 लाख 50 हजार आहे. मात्र पाकिस्तानमध्ये जास्त कर असल्याने त्याची 22 लाख 51 हजारांना विक्री होते. या कारचे डिझाइन भारतात विकल्या जाणाऱ्या कारपेक्षा थोडी वेगळी ठेवण्यात आली आहे. 

2/5

मारुती सुझुकीची स्विफ्ट ही पाकिस्तानात सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार आहे. पाकिस्तानीही या कारचे वेडे असून आहेत. भारतात या कारची किंमत सुमारे 12 लाख 29 हजार रुपये आहे, तर पाकिस्तानमध्ये ही कार 42 लाख 56 हजार रुपयांना विकली जाते. 

3/5

मोस्ट पॉप्युलर यादीतील तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कंपनी मारुती सुझुकी आहे.  मारुती सुझुकीची बोलन कार विकली जाते. ही कार भारतात विकली जाणारी ओम्नीची नवीन डिझाईन आहे. भारतात ही कार सुमारे 5.5 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तर पाकिस्तानमध्ये त्याची किंमत सुमारे 19 लाख 40 हजार रुपये आहे. 

4/5

टोयोटाची सेडान कोरोला ही पाकिस्तानात विकली जाणारी चौथी कार आहे. उच्चभ्रू वर्गातील पाकिस्तानी ही कार घेण्यास प्राधान्य देतात. भारतात ही कार 17 लाख ते 22 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर पाकिस्तानमध्ये हीच कार 61 लाख ते 77 लाख रुपयांपर्यंत विकली जाते. 

5/5

या यादीतील पाचव्या क्रमांकावर होंडा सिटी कार आहे. आलिशान कार आवडणाऱ्या पाकिस्तानी लोकांनाही या कारचे वेड आहे. या कारचे 6 मॉडेल पाकिस्तानात विकले जातात. भारतात या कारच्या मॅन्युअल वेरिएंटची किंमत 13 लाख 80 हजार रुपये आहे. तर हीच कार पाकिस्तानमध्ये 47 लाख 80 हजार रुपये आहे.