बदललेल्या हवामानाचा मुंबईकरांना 'ताप', नागरिकांनो काळजी घ्या

Mumbai Weather News: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवताना दिसतोय. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.

Surabhi Jagdish | Jan 30, 2024, 09:43 AM IST
1/7

सध्या मुंबईकरांना दिवसा उकाडा आणि रात्री थंडीचा सामना करावा लागतोय. 

2/7

या तापमान बदलामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतोय. 

3/7

मुंबईत दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सुमारे 16 अंश इतका फरक असून नागरिकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन धोका वाढला आहे. 

4/7

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या वातावरणात नागरिकांनी थंड अन्न टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना अॅलर्जी आहे, त्यांनी मास्कचा वापर करावा. 

5/7

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या वातावरणात नागरिकांनी थंड अन्न टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना अॅलर्जी आहे, त्यांनी मास्कचा वापर करावा. 

6/7

तापमानात 10 अंशापेक्षा जास्त फरक असल्यास सर्दी-खोकला यांसारख्या संसर्गाचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे श्वसनमार्गाच्या इन्फेक्शनची समस्या वाढते.

7/7

दिवसा गरम वातावरण आणि रात्री थंड अशा वातावरणात उन्हात बाहेर जाणं टाळावं.