समृद्धी महामार्गावरून कार प्रवासासंदर्भातील मोठी बातमी; लक्षपूर्वक वाचा ही माहिती

samruddhi mahamarg : तुम्ही कधी स्वत:च्या वाहनानं समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे का? 

Nov 29, 2023, 12:27 PM IST

samruddhi mahamarg : अमर काणे, झी मीडिया, नागपूर: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गासंदर्भात दर दिवशी काही नवे विषय चर्चेत येतात. असाच एक विषय सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. 

1/7

महाराष्ट्राची भाग्यरेषा

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

महाराष्ट्राची भाग्यरेषा असा उल्लेख केल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून दिवाळीच्या दिवसांदरम्यान कार प्रवासाचा एक नवा विक्रम रचला गेला आहे. 

2/7

नागपूर ते मुंबई-पुणे

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

नागपूर ते मुंबई-पुणे असा प्रवास (दोन्ही वेळा याच मार्गानं) करण्यासाठी यंदाच्या वर्षी दिवाळीदरम्यान समृद्धी महामार्गाला  मोठी पसंती देण्यात आली. 

3/7

30 हजार 543 कार

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

समृद्धी महामार्गावरून 18 नोव्हेंबरला तब्बल 30 हजार 543 कार धावल्या. आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक कार प्रवास होण्याचा हा विक्रमी दिवस.   

4/7

रेल्वे रिझर्वेशनची अडचण

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

दिवाळीत रेल्वे रिझर्वेशनची अडचण, प्रचंड महागलेला विमान प्रवास यामुळे समृद्धी महामार्गाला व्यापारी आणि चाकरमान्यांची पसंती दिली. 

5/7

सर्वाधिक कार प्रवास

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

ऑक्टोबर महिन्यात 1 ते 21 तारखेपर्यंत 2 लाख 65 हजार 856 कार या मार्गावरून धावल्या. 

6/7

नवा विक्रम

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

नोव्हेंबर महिन्यात या कालावधीत म्हणजे 1 ते 21 नोव्हेंबरदरम्यान 3 लाख 82 हजार 416 कार समृद्धीवरून धावल्या आणि एक नवा विक्रम रचला गेला. 

7/7

तुम्ही कधी प्रवास करताय?

nagpur samruddhi mahamarg record breaking cars travelled diwali

अशा या विक्रमी समृद्धी महामार्गावरून तुम्ही कधी प्रवास करताय?