राष्ट्रवादी, काँग्रेस ते भाजप... फक्त दहावी पास आहेत राजकीय वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्या नवनीत राणा

शिक्षण दहावी पास,  मुंबईत 3 फ्लॅट, 12 कोटींची संपत्ती, 7 कोटींचे कर्ज जाणून नवनीत राणा यांच्याविषयी संपूर्ण माहिती. 

Mar 27, 2024, 20:20 PM IST

Navneet Rana : अखेर नवनीत राणा यांना भाजपने ग्रीन सिग्नल दिला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस ते भाजप अशा अनेक पक्षांची मदत घेत नवनीत राणा यांचा राजकीय प्रवास सुरु आहे. 

1/7

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

2/7

3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत नवनीत राणा यांचा जन्म झाला. त्यांनी काही मॉडेलिंगमध्ये करिअर केले. बाबा रामदेव यांच्या योग शिबीरात त्यांची ओळख रवी राणा यांच्याशी झाली.  2011 मध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात या दोघांनी लग्न केले. 

3/7

नवनीत राणा यांच्या नावावर मुंबईत 3 फ्लॅट आहेत. अंधेरीतील ओशीवरा, गोरेगाव आणि खार येथे त्यांचे हे फ्लॅट आहेत.  

4/7

2019 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नवनीत राणांकडे तब्बल 12 कोटी 45 लाख 54 हजार 656 रुपयांची संपत्ती होती. तर त्यांचावर 7 कोटींचे कर्ज होते. 

5/7

2014 च्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नवनीत राणांकडे 2 कोटींची संपत्ती होती. तर, त्यांच्यावर जवळपास 18 कोटींचे कर्ज होते.   

6/7

2019 मध्ये त्यांनी नवनीत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनातून अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता मात्र, नवनीत राणा थेट कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. 

7/7

2014 च्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला.