पाकिस्तानी खेळाडूला टीमकडून मिळेना भाला, नीरज चोप्राने दिला 'हा' सल्ला

नीरज आणि नदीम दोघांमध्ये मैदानात मोठी चुरस पाहायला मिळते. असे असले तरी मैदानाबाहेर दोघांची घट्ट मैत्री आहे.

| Mar 19, 2024, 14:04 PM IST

Neeraj chopra:नीरज आणि नदीम दोघांमध्ये मैदानात मोठी चुरस पाहायला मिळते. असे असले तरी मैदानाबाहेर दोघांची घट्ट मैत्री आहे.

1/9

पाकिस्तानी खेळाडूला टीमकडून मिळेना भाला, नीरज चोप्राने दिला 'हा' सल्ला

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने पाकिस्तानी भालाफेक प्रतिस्पर्धी खेळाडू अर्शद नदीमला सल्ला दिला आहे. नदीमला नवा भाला घेण्यासाठी संघर्ष करतोय, त्याला संघ व्यवस्थापनाकडून तो घेऊन दिला जात नाही, यावर विश्वास बसणं कठीण असल्याची प्रतिक्रिया नीरज चोप्रानं दिलीय. 

2/9

नदीमचा 90.18 मीटरचा थ्रो

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

पाकिस्तानचा टॉपचा भालाफेक खेळाडू नदीमने 2022 मध्ये बर्मिघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90.18 मीटरचा थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवले होते. 2018 च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले होते. तिथे नीरज चोप्रा टॉपला होता.

3/9

मैदानाबाहेर घट्ट मैत्री

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

नीरज चोप्रा हा ऑलम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. नीरज आणि नदीम दोघांमध्ये मैदानात मोठी चुरस पाहायला मिळते. असे असले तरी मैदानाबाहेर दोघांची घट्ट मैत्री आहे. 

4/9

विश्वास ठेवणं कठीण

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

नदीमला भाला मिळत नाही, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. नदीमची कामगिरी पाहता हा इतका मोठा मुद्दा नको व्हायला हवा होता, असे नीरजने सांगितले. 

5/9

आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाला

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाला मिळावा यासाठी मी संघर्ष करतोय असे नदीमने एका मुलाखतीत सांगितले होते. याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली होती.

6/9

फॅसिलिटी मिळणे आवश्यक

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

मी 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय खेळात सहभागी व्हायला सुरुवात केली तेव्हा मला हा भाला मिळाला. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅथलिटला त्याचे साहित्य आणि ट्रेनिंग फॅसिलिटी मिळणे आवश्यक असते, असे त्याने म्हटले होते.

7/9

नदीम एक चॅम्पियन

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

नदीमला पाकिस्तानी सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळायला हवे. नदीमकडे भाला खरेदी करण्याचे साधन नाही, असं नाहीय. तो एक चॅम्पियन आहे. काही ब्राण्डसोबत काम करत असेल,त्याने काही पैसेही जमवले असतील. 

8/9

नदीमला सहकार्य करायला हवे

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

ज्याप्रकारे आमचे सरकार सहकार्य करते, त्याप्रमाणे पाकिस्तानी टीमने नदीमची परिस्थिती पाहून त्याला सहकार्य करायला हवे, असे नीरजने सांगितले.

9/9

गुडघ्याची सर्जरी

Neeraj chopra Give Advice to arshad nadeem on new javelin

डिसेंबर 2022 मध्ये नदीमच्या कोपराचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर गुडघ्याची सर्जरी झाली होती. यामुळे त्याला हांगझोऊ एशियन गेम्समध्ये सहभागी होता आले नव्हते. तिथे नीरज चोप्राने सुवर्ण पदक मिळवले होते.