'.....तर मी वेडी होईन', नीतू कपूर घऱातील स्थितीवर स्पष्टच बोलल्या, 'रणबीर आणि मुलीने मला...'

एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये असणाऱ्या नीतू कपूर यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी कमबॅक केलं आहे.   

Shivraj Yadav | Oct 20, 2024, 19:54 PM IST

एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये असणाऱ्या नीतू कपूर यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी कमबॅक केलं आहे. 

1/9

बॉलिवूडच्या 70, 80 च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये नीतू कपूर यांचं नावही प्रामुख्याने घेतलं जायचं. यशस्वी करिअर असतानाही नीतू कपूर यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी कमबॅक केलं आहे.   

2/9

पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नव्याने सुरुवात करणाऱ्या नीतू कपूर यांनी , आजकाल सेलिब्रिटीज ट्रोल्सचा सहज बळी ठरत असल्याने त्यांना पुन्हा काम करण्यास संकोच वाटत होता असा खुलासा केला आहे.   

3/9

रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनी त्यांच्या आईला पुन्हा नव्याने भरारी घेण्यास प्रोत्साहित केलं ज्यामुळे त्यांना खरोखर आनंद मिळाला, असा खुलासा त्यांनी केला आहे.   

4/9

नीतू कपूर यांनी नुकतंच Fabulous Lives vs Bollywood Wives च्या नवीन सीझनमध्ये खास हजेरी लावली. यानिमित्ताने रिद्धिमाने स्क्रीनवर पदार्पण केलं आहे. एका एपिसोडमध्ये, नीतू कपूर यांनी मुलीला सांगितले की, "पप्पा (ऋषी) गेल्यानंतर...मी तयार नव्हते. ट्रोल कसे असतात हे तुला माहीत आहे. पण तू (रिद्धिमा आणि रणबीर) मला प्रोत्साहित केलंस. मी एक शो केला, जाहिराती केल्या. पण तिथे जाण्यापूर्वी मी थरथरत असे".  

5/9

आपली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं असंही नीतू कपूर यांनी सांगितलं.   

6/9

"म्हणूनच यावर्षी मी बॅकसीट घेतली आहे. जर मी घरी थांबले आणि काहीच केलं नाही तर मी वेडी होईन. पण आज मला फार बरं वाटत आहे. गतवर्षापर्यंत मला फार चांगलं वाटत नव्हतं," असं त्यांनी सांगितलं,  

7/9

ऋषी कपूर यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त नीतू कपूर यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.तुमच्या मृत्यूनंतर आयुष्य सारखं राहिलेलं नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.   

8/9

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी रफू चक्कर, अमर अकबर अँथनी आणि दो दूनी चार यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं".  

9/9

नीतू कपूरने 1980 मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न केलं. 1980 मध्ये रिद्धिमा आणि 1982 मध्ये रणबीरचा जन्म झाला. 1983 मध्ये आलेल्या 'जाने जान' चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेतला. काही कॅमिओ व्यतिरिक्त, 2022 मध्ये 'जुगजग जीयो' चित्रपटाद्वारे त्यांनी पुनरागमन केले.