PHOTOS: उभीच्या उभी घरं दुभंगली, इमारती कोसळल्या; नेपाळमध्ये क्षणात सारंकाही उध्वस्त

Nepal Earthquake : स्थानिक वृत्तसंस्था आणि एएनआयनं घटनास्थळाची काही छायाचित्र समोर आणत नेपाळमधील परिस्थिती किती विदारक आहे याचं चित्र जगासमोर आणलं. 

Nov 04, 2023, 10:06 AM IST

Nepal Earthquake : नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळं देशातील बहुतांश भाग उध्वस्त झाला आहे. एका भूकंपानं क्षणात होत्याचं नव्हतं केल्यामुळं सध्या सर्वत्र हाहाकार माजल्याचं दिसत आहे. 

 

1/8

6.4 रिश्टर स्केलचा भूकंप

Nepal Earthquake devastating photos

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला आणि या भूकंपानं देशातील बहुतांश भाग उध्वस्त केला. 

2/8

अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली

Nepal Earthquake devastating photos

आतापर्यंत नेपाळमधील या भूकंपानं140 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. किंबहुना अद्यापही अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती यंत्रणांनी व्यक्त केली आहे. 

3/8

रुग्णालयांमध्ये उपचार सुरु

Nepal Earthquake devastating photos

स्थानिक बचाव पथकं आणि यंत्रणांच्या माहितीनुसार जखमींची संख्याही जास्त असून सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.   

4/8

भूकंपाचा केंद्रबिंदू

Nepal Earthquake devastating photos

नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता, जिथं सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

5/8

इमारती कोसळल्या

Nepal Earthquake devastating photos

अनेक भागांमध्ये उभीच्या उभी घरं दुभंगली गेली, तर कुठं इमारती कोसळल्या. छायाचित्रांच्या माध्यमातून घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती असेल हे लगेचच लक्षात आलं. 

6/8

क्षतिग्रस्त भाग

Nepal Earthquake devastating photos

नेपाळमधील बेहरी रुग्णालय, कोहालपूर वैद्यकिय महविद्यालय, नेपालगंज मिनिटरी रुग्णालय, पोलीस रुग्णालय सर्वाधिक क्षतिग्रस्त असल्याचं लक्षात आलं.   

7/8

हेलिकॉप्टर सुविधा Standby

Nepal Earthquake devastating photos

सध्याच्या घडीला नेपाळमध्ये हेलिकॉप्टर सुविधा Standby ठेवण्यात आली असून, सर्व विमानसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. 

8/8

नेपाळवर संकट

Nepal Earthquake devastating photos

गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये भूकंपसदृश परिस्थिती सातत्यानं उदभवत असल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळमध्येच असल्याचं सांगण्यात येतं.