अॅम्बेसिडर पासून जिप्सीपर्यंत सर्वच गाड्या पुन्हा एकदा होणार लॉन्च

Jun 18, 2018, 12:53 PM IST
1/6

भारतीय बाजारात पुन्हा एकदा जुन्या गाड्यांचा काळ येणार आहे. होय, हे आम्ही नाही तर सर्वच मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे. अॅम्बेसिडर, ह्युंदाई सँट्रो, मारुती सुजुकी झेन आणि मित्सुबिशी लँसर या गाड्या पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर दिसणार आहेत. या कार नव्या रंग-रुपात लॉन्च होणार आहेत. कंपन्यांनी या कारमध्ये इंटेरियरसोबतच एक्सटेरियरमध्येही बदल केले आहेत. 

2/6

ह्युंदाई सँट्रो : भारतात पुन्हा एकदा ह्युंदाई सँट्रो कार लॉन्च होणार आहे. ही कार सँट्रो Eon आणि ग्रँड i10 यांच्या सेगमेंटमध्ये असणार आहेत. ही कार मॅन्युअल आणि एएमटी ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात भारतीय बाजारात 20 वर्ष पूर्ण होत असल्याने कंपनी ही कार लॉन्च करु शकते. मात्र, अद्याप यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाहीये.

3/6

भारतीय अॅम्बेसिडर : पूर्वीच्या काळी स्टेटस मानली जाणारी अॅम्बेसिडर पुन्हा एकदा भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे. अॅम्बेसिडर बनवणारी कंपनी हिदुस्थान मोटर्स 2017 मध्ये अवघ्या 80 कोटींमध्ये विकली गेली. ही कंपनी फ्रान्समधील पीएसए ग्रुपने खरेदी केली. आता ही कंपनी सीके बिरला ग्रुपसोबत मिळून भारतात नवी अॅम्बेसिडर कार बनवण्यासाठी काम करत आहे. नव्या अॅम्बेसिडर कारचा लूकही दमदार असल्याची अपेक्षा आहे. ही गाडी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

4/6

मारुती झेन : काही दिवसांपूर्वी बंद झालेली मारुती झेन ही नव्या लूकमध्ये लॉन्च होण्याची चर्चा आहे. स्विफ्ट कार नव्या लूकमध्ये लॉन्च झाल्यानंतर कंपनी आता मारुती झेन (Maruti Zen) क्रॉसओव्हर/एसयूव्ही अवतार लॉन्च करु शकते. 2002 साली बलेनो बंद केल्यानंतर आता मारुतीने प्रिमियम हेचबॅक सेग्मेंटमध्ये बलेनो पुन्हा एकदा लॉन्च केली आहे. त्यामुळे आता मारुती झेन ही नव्या रुपात लॉन्च केलं जाण्याची अपेक्षा आहे. ही कार जानेवारी 2020 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

5/6

मित्सुबिशी लॅन्सर : जापानी कार निर्माता कंपनी मित्सुबिशी कंपनी आपली जुनी लॅन्सर कार पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. या कारची हुंदाई क्रेटा, रेनॉल्च कॅप्चर आणि महिंद्रा XUV 500 सोबत टक्कर असेल. मित्सुबिशी लॅन्सर भारतीय बाजारात 2020 च्या मध्यावधीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

6/6

मारुती सुजुकी जिप्सी : मारुती जिप्सी पुन्हा एकदा भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. यावेळी जिप्सीला रिप्लेस करुन कंपनी बाजारात Suzuki Jimny भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जापानमध्ये असलेल्या प्लान्टमध्ये Suzuki Jimny गाडीचं प्रोडक्शनही सुरु करण्यात आलं आहे. 2018 च्या शेवटपर्यंत जापानच्या बाजारात ही गाडी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. तर, 2020च्या अखेरीस ही गाडी भारतीय बाजारात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.