'मिकी' मुंबईत आलाय...त्याला भेटाच

Mar 08, 2019, 12:06 PM IST
1/8

'बन मस्का' फेम शिवराज वायचळ 'मिकी'तून प्रेक्षकांच्या भेटीला

2/8

'मिकी' या नाटकातील गोष्ट 1984 साली घडते.     

3/8

केशव, आपले वडील सखाराम आणि मित्र अँथनी यांच्याबरोबर जवळ जवळ डबघाईला आलेलं एक सलून चालवतो.  फक्त दुर्दैवाने या सलूनमध्ये एक मृतदेह येऊन पडतो. 

4/8

केशव-अँथनी-सखाराम सलूनवर आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी या मृतदेहाचा वापर करून एक कट रचतात. 

5/8

त्यामुळे या तिघांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंभीर आणि काही विनोदी घटना, म्हणजे हे नाटक.  

6/8

'मिकी' ही शेक्सपिअरच्या शैलीतली एक आधुनिक शोकांतिका आहे, जी दडपण आणि डगमगत्या नैतिकतेमध्ये अडकलेल्या मानवी स्वभावाचं दर्शन घडवते.

7/8

या नाटकाला 'झी'ची अनेक नामांकने मिळाली आहेत. 

8/8

नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर येथे आहे.