श्रिया नाही, मग कोण आहे पिळगावकर दामपत्याची दत्तक मुलगी ? म्हणाली, सचिन, सुप्रिया यांनी प्रेम केले पण..
एकेकाळी जिला स्वतःची मुलगी मानायचे आता, तिच्या बद्दल पिळगावकर दामपत्य बोलतानासूद्धा दिसत नाही. जाणून घ्या नक्की काय प्रकार आहे.
सचिन आणि सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी एकेकाळी फार चर्चेत होती. मग मात्र अचनाक दिसायची बंद झाली. ती कुठे असते सध्या?
1/8
एव्हरग्रीन कपल

मराठी सिनेसृष्टीत अनेक प्रसिद्ध जोडपी आहेत. याच नावाजलेल्या जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर. त्यांना कपल गोल्स्, एव्हरग्रीन कपल, मेड फॉर इचअदर, अशा अनेक उपमा दिल्या जातात.1983साली 'नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटात एकत्र काम करताना, सचिन पिळगावकरांना त्यांची नवरी मिळाली होती. दोन वर्षांच्या मैत्री संबंधांनंतर 1985 साली त्यांनी लग्न केले.
2/8
श्रिया पिळगावकर

त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरसूद्धा आता चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख बनवत आहे. 2013साली सचिन, सुप्रिया आणि श्रिया यांनी 'एकुलती एक' या सिनेमात सहकुटूंब काम केले. या चित्रपटातून श्रियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'मिरझापूर'सारख्या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर, तिचे नाव बॉलिवूडमध्येसूद्धा झळकले.
3/8
श्रिया दत्तक घेतलेली नाही

वारंवार श्रिया ही दत्तक घेतलेली मुलगी आहे का?असा प्रश्न विचारला जातो. असा प्रश्न विचारला जाण्याचे कारण म्हणजे, काही वर्षांपुर्वी सचिन-सुप्रिया यांनी मुलगी दत्तक घेतल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. 'मी दत्तक नाही' हे श्रियाने वारंवार सांगितले तरी,अनेकांना ती दत्तक मुलगी श्रियाच वाटते. मात्र तसे नसून 'ही दत्तक घेतलेली मुलगी कोणीतरी औरच आहे.'
4/8
ही आहे दत्तक मुलगी

ज्या दत्तक मुलीबद्दल सचिन-सुप्रिया बोलायचे, तिचे नाव 'करिश्मा मखानी' आहे. करिश्मा ही कुलदीप मखानी या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या, एका रेस्टॉरंट मालकाची मुलगी आहे. सचिन आणि कुलदीप खास मित्र होते. ते कुलदीपला आणि करिश्माला स्वतःच्या परिवाराचा भाग समजायचे. कुलदीपने सचिन,सुप्रिया यांना जेव्हा करिश्माला भेटवले होते, तेव्हा ती 3 वर्षाची होती. तिचा गोड चेहरा बघून ते तिच्या प्रेमात पडले. करिश्माची आई सतत आजारी असायची, म्हणून सचिनने तिला घरी नेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा श्रियाचा जन्मही झाला नव्हता. करिश्माच्या वडीलांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. ती 1988 पासून पिळगावकरांच्या घरी राहत होती. 1990 साली तिने सचिन यांच्या 'आत्मविश्वास' या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. सगळंच छान चालू असताना, 'अचानक हा आनंदी परिवार मोडकळीस आला.'
5/8
करिश्माचे अपहरण केल्याचा आरोप

2005 साली एका मुलाखतीत सचिन यांनी, करिश्माच्या वडिलांनीच तिचं अपहरण केल्याचा आरोप केला होता. चक्क 'वडिलांनी मुलीचं अपहरण केलं' म्हणून हा वाद खूप मोठा झाला होता. हे सगळं प्रकरण पाहता अखेर, करिश्मानंच एक मुलाखत देत यावर धक्कादायक खुलासा करत सांगितलं, "मला पिळगावकरांनी कायदेशीररित्या दत्तक घेतले नव्हते, मला माझे खरे वडील कोण आहे हे माहित आहे. सचिन आणि सुप्रिया यांनी मला आईवडीलांचे प्रेम दिले. पण त्यांनी माझ्या वडीलांवर केलेले आरोप साफ खोटे आहेत."
6/8
अपहरणाचा आरोप खोटा

करिश्मा म्हणाली, "माझे कोणीही अपहरण केले नाही. 'पिळगावकरांनीच माझ्या वडीलांना सांगितले होते' की, 'करिश्माला घेऊन जा.' 12 वर्षांनंतर मी पुन्हा भारतात आले. तेव्हा '6 महिने पिळगावकरांकडेच राहिले होते'. पण माझे येणे त्यांना न आवडल्याचे मला जाणवले. 'त्यांनी स्वतःहून मला घर सोडून जायला सांगितले'. या सर्व प्रकाराचा मला मानसिक त्रास झाला.
7/8
सिंम्पथी वोट
