आत्ताच तुरुंगातून सुटली ड्रग्स लॉर्डची पत्नी, 2-3 देशांची अर्थव्यवस्था चालेल एवढी Net Worth

Mansi kshirsagar | Sep 14, 2023, 18:25 PM IST
1/7

आत्ताच तुरुंगातून सुटली ड्रग्स लॉर्डची पत्नी, 2-3 देशांची अर्थव्यवस्था चालेल एवढी Net Worth

Notorious drug lord El Chapo wife will be released

मॅक्सिको येथील कुख्यात ड्रग माफिया जोआक्विन अल चापो उर्फ गुजमॅन याची पत्नी तब्बल तीन वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आली आहे. माजी ब्युटी क्वीन असलेली एम्मा कोरोनेल ऐस्पुरो हिची अमेरिकन तुरुंगातून सुटका झाली आहे. 2021 साली हेरोइन, कोकोन, मरिजुआना आणि मेथामफेटामिन यासारखे ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. यावेळी एम्माच्या संपत्तीचीही चर्चा रंगली आहे. कोण आहे एम्मा कोरोनेल जाणून घेऊया. 

2/7

वयाच्या 18व्या वर्षी लग्न

Notorious drug lord El Chapo wife will be released

 एम्माचा जन्म 2 जुलै 1989 साली सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. एम्मा अल्पावधीतच प्रकाशझोतात आली होती. टीनएजर असतानाच तीने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर एम्माची ओळख कुख्यात ड्रग माफिया अल चापोसोबत झाली. वयाच्या 18व्या वर्षीच तीने चापोसोबत लग्न केले. 

3/7

ड्रग्स तस्करीच्या जाळ्यात

Notorious drug lord El Chapo wife will be released

अल चापो आणि एम्मा यांना दोन जुळ्या मुली आहेत. एम्मा अल्पवयीन असल्यापासून ड्रग्स तस्करीच्या जाळ्यात ओढली गेली होती. 

4/7

जन्मठेपेची शिक्षा

Notorious drug lord El Chapo wife will be released

 फेब्रुवारी 2019मध्ये हत्या आणि अमली पदार्थाची तस्करी या आरोपाअंतर्गंत अल चापो अमेरिकेतील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी ऑपरेशन सिनालोआ कार्टेल चालवण्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

5/7

तीन वर्षांपर्यंत शिक्षा

Notorious drug lord El Chapo wife will be released

2021मध्ये एम्माला विविध आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले होते. मनी लाँड्रिंग, विदेशात ड्रग्सची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी असे आरोप होते. एम्माला चार वर्षांची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून तीन वर्षांपर्यंत शिक्षा दिली. 

6/7

तुरुंगातून पळून जाण्यास मदत

Notorious drug lord El Chapo wife will be released

एम्मा कोरोनलवर अमली पदार्थांची तस्करी करण्याव्यतिरिक्त 2015 मध्ये पती एल चापोला तुरुंगातून पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप करण्यात आला होता. 34 वर्षीय एम्माला त्यावेळेस वॉशिंगटन डीसी येथे विमानतळाबाहेर अटक करण्यात आली होती. 

7/7

5 बिलीयन डॉलरची मालकीण

Notorious drug lord El Chapo wife will be released

 एम्माच्या प्रकरणीवर सुनावणी असताना तिने तिच्यावरील आरोप कबुल केले होते. तसंच, कोर्टाने एम्माची 1.5 मिलियन डॉलरची मालमत्ता जप्त केली होती व तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दरम्यान, एम्माच्या अटकेनंतर ती एकून 5 बिलीयन डॉलरची मालकीण असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या