49 वर्ष जुना भयानक चित्रपट, ज्यावर 1-2 मध्ये नव्हे तर 150 देशांमध्ये घालण्यात आली होती बंदी

Psychological Horror Thriller Ban Movie: या चित्रपटावर 1 किंवा 2 नव्हे तर 150 देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटावर बरीच टीका झाली होती. असे असूनही या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली.  

तेजश्री गायकवाड | Feb 24, 2025, 16:05 PM IST

Psychological Horror Thriller Ban Movie: या चित्रपटावर 1 किंवा 2 नव्हे तर 150 देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटावर बरीच टीका झाली होती. असे असूनही या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली.

 

1/7

Psychological Horror Thriller Ban Movie: असे अनेक चित्रपट आहेत ज्यावर अनेक देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने बंदी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यावर 1 किंवा 2 नव्हे तर 150 देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटावर बरीच टीका झाली होती. लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला होता. असे असूनही या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली.   

2/7

असे अनेक चित्रपट आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाला सामोरे जावे लागते. यामुळे कधी कधी त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणीही केली जाते. याशिवाय असे अनेक चित्रपट आहेत ज्यांवर विविध देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा, चित्रपटात दाखवलेले दृश्य आणि अनेक वादांमुळे 150 देशांनी बंदी घातली होती.  

3/7

1975 मध्ये प्रदर्शित झालेला हा इटालियन चित्रपट आजवरचा सर्वात वादग्रस्त चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचे नाव होते 'सालो, ऑर द  120 डेज ऑफ सदोम' (Salò, or the 120 Days of Sodom). याचे दिग्दर्शन पियर पाओलो पासोलिनी यांनी केले होते. हा चित्रपट मार्क्विस डी साडे यांच्या 1785 मधील 'द 120 डेज ऑफ सदोम' या कादंबरीवर आधारित आहे,  त्याची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेतलेली आहे. पासोलिनीचा हा शेवटचा चित्रपट होता आणि या चित्रपटाबाबत बरेच वाद झाले होते.  

4/7

चित्रपटात काही मुलांचे अपहरण करून त्यांना नाझींचे कठपुतळे बनवले जाते. या चित्रपटात घाणेरड्या कृत्यांसह बलात्कार, खून आणि अपहरण केलेल्या मुलांवर होणारा भयंकर छळ दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 1993 पर्यंत ऑस्ट्रेलियात बंदी होता, नंतर 1998 मध्ये पुन्हा बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक पियर पाओलो पासोलिनी आपल्या चित्रपटाचा बचाव देखील करू शकले नाहीत, कारण प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.  

5/7

वादग्रस्त विषय तसेच बोल्ड-अभद्र दृश्यांमुळे हा चित्रपट जगभर वादाचा विषय बनला होता. कथा चार श्रीमंत आणि भ्रष्ट लोकांभोवती फिरते जे 18 तरुणाचे  अपहरण करतात आणि चार महिने त्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ करतात.  

6/7

या चित्रपटात पाओलो बोनाचेली, जियोर्जियो कॅटाल्डी, उबेर्तो पाओलो क्विंटवाले आणि अल्डो व्हॅलेटी सारखे कलाकार दिसले. याशिवाय कॅटरिना बोराटो, एल्सा डी जिओर्गी, हेलन सर्जर आणि सोनिया सविआंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

7/7

चित्रपटात दाखवण्यात आलेली हिंसक दृश्ये आणि अमानुष छळ यामुळे अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास 6 लाख डॉलर (5.20 कोटी रुपये) होते. जरी बंदीमुळे त्याच्या कमाईचे अचूक आकडे उपलब्ध नाहीत, परंतु अनेक अहवालांचा दावा आहे की या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अंदाजे $ 1.8 दशलक्ष (रु. 15.60 कोटी) कमाई केली आहे. आजही हा चित्रपट चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला जातो.