Most Expensive Birds: 'हे' आहेत जगातील सर्वात महाग पक्षी, किंमत ऐकून डोळे गरगरतील
अनेकांना पक्षी (Bird) किंवा प्राणी (Animals) पाळण्याचा छंद असतो. आपल्या आवडत्या पाळीव प्राणी किंवा पक्षासाठी ते वाट्टेल ती किंमतही मोजायला तयार असतात. जगातील सर्वात महाग पाळीव श्वानाची (Pet Dog) किंमत करोडोंच्या घरात आहे. आता पक्षाची किंमतही कोट्यवधी असल्याचं पाहिल मिळतंय. सर्वात महागड्या पक्षी कोण आहे आणि त्याची किंमत साधारण किती असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता? जाणून घ्या उत्तर
Most Expensive Bird : अनेकांना पक्षी (Bird) किंवा प्राणी (Animals) पाळण्याचा छंद असतो. आपल्या आवडत्या पाळीव प्राणी किंवा पक्षासाठी ते वाट्टेल ती किंमतही मोजायला तयार असतात. जगातील सर्वात महाग पाळीव श्वानाची (Pet Dog) किंमत करोडोंच्या घरात आहे. आता पक्षाची किंमतही कोट्यवधी असल्याचं पाहिल मिळतंय. सर्वात महागड्या पक्षी कोण आहे आणि त्याची किंमत साधारण किती असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता? जाणून घ्या उत्तर

जगातील सर्वात महागडा पक्षी हा रेसिंग कबूतर आहे. 2020 मध्ये अरमांडो (Armando) नावाच्या एक रेसिंग कबूतर (Racing pigeons) $1.4 मिलिअन म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 115 कोटी रुपयांत विकला गेला होता. अरमांडो हा चॅम्पियन रेसर आहे. रेसिंग कबूतरांना त्यांच्या वेगासाठी पाळल जातं. आखाती देशात कबूतरांच्या स्पर्धा होतात आणि यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात रेसिंग कबूतराचा उडण्याचा वेग प्रती तास 60 मील इतका असतो. अरमांडोच्या नावावर सर्वात महागड्या पक्षाची नोंद आहे. हा विक्रम अद्याप तुटलेला नाही.


