एका देशातील परिणामांचे दुसऱ्या देशात पडसाद

Jan 23, 2018, 17:00 PM IST
1/4

अमेरिकेत ठप्प कामकाजाचा परिणाम नेपाळमध्ये देखील पाहायला मिळाला.नेपाळमधील वृत्तपत्रानुसार नेपाळमधील अमेरिकेचं दूतावासने म्हटलं आहे की, अमेरिकेमध्ये कामकाज ठप्प झाल्यामुळे अमेरिकेची सेंटर लायब्रेरी बंद राहिल. यामुळे त्यांचं ट्विटर पेज देखील अपडेट नाही होणार. ज्यांनी वीजासाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी दुतावास सुरु राहिल. पण येणाऱ्या काळात अमेरिकेतील परिणाम इतर देशांमध्ये देखील पाहायला मिळू शकतात.

2/4

मुलींना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी मलाला गर्ल एजुकेशन फंड आणि अॅपलने हाथ मिळवनी केली आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनच्या माहितीनुसार मलालाच्या वडिलांना मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना सशक्त करण्यासाठी `मलाला गर्ल एजुकेशन फंड`ची स्थापना केली होती. दावोस मध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) मध्ये ती बोलणारे. अॅपलच्या मदतीने मलाला भारत आणि लॅटिन अमेरिकेमधील फंडिंग प्रोग्रामची सुरुवात करणार आहे. ती 1 लाखाहून अधिक मुलींना सेंकेंड्री शिक्षा देण्याचं काम करणार आहे. अॅपल या मुलींना टेक्नोलॉजी आणि रिसर्च सारख्या विषयांमध्ये शिक्षणासाठी मदत करेल.

3/4

उत्तर प्रदेशमधील सीतापूरमधील फायनान्स कंपनीच्या एजेंटने शेतकऱ्याला ट्रक खाली चिरडल्याची बातमी बांग्लादेशमधील द इंडिपेंडेंट वृत्तपत्रात छापण्यात आली आहे. द इंडिपेंडेंटने लिहिलं आहे की, शेतकऱ्यावर  $1400 चं कर्ज होतं पण कर्ज न फेडल्याने त्याची हत्या केल्याची बातमी छापण्यात आली आहे.

4/4

बांग्लादेशमध्ये 19 फेब्रुवारीला राष्ट्रपती निव़डणूक होणार आहे. बांग्लादेशमधील वृत्तपत्र अखबार द इंडिपेंडेंटच्या बातमीनुसार कायदा मंत्री अनीश-उल-हक यांनी ही माहती दिली की, राष्ट्रपती अब्दुल हामिद यांचा कार्यकाळ 23 एप्रिलला संपेल.