'पंचायत' मध्ये 20 हजार पगार घेणारा 'सचिव जी' उर्फ जितेंद्र कुमार एका एपिसोडसाठी घेतो इतकी मोठी रक्कम

'पंचायत' या सीरिजच्या 3 भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या सीरिजमध्ये सचिव जीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता जितेंद्र कुमार सीरिजमध्ये जरी महिन्याला 20 हजार रुपये पगार घेत असला तरी तो एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो याविषयी तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया त्याचं मानधन

Diksha Patil | May 04, 2024, 19:31 PM IST
1/7

जितेंद्र कुमार

अभिनेता जितेंद्र कुमारच्या 'पंचायत' या सीरिजमधील सचिवची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 

2/7

तिसरा सीझन

या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना आतुरता असताना आता याच महिन्यात 3 रा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

3/7

किती घेतो मानधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी जितेंद्र हा 50 हजार रुपये मानधन घेतो.   

4/7

एकूण किती घेतलं मानधन

'पंचायत' च्या दोन्ही सीझनचा विचार केला तर त्याचे 16 एपिसोड असल्यानं जितेंद्रनं एकूण 8 लाख रुपये मानधन घेतलं. 

5/7

एकूण नेटवर्थ

मीडिया रिपोर्ट्नुसार, जितेंद्रची एकूण नेटवर्थ ही जवळपास 7 कोटी आहे. आयआयटी खडगपुरमध्ये सिव्हिल इंजीनियरिंग करत असताना जितेंद्र कुमाला अभिनयाची आवड निर्माण झाली. 

6/7

2013 मध्ये 'मुन्ना जज्बाती: द क्यू-टिया इंटर्न' मध्ये त्यानं अभिनय केला, त्याआधी त्यानं अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. 

7/7

तर 'मुन्ना जज्बाती: द क्यू-टिया इंटर्न' इतका व्हायरल झाला की त्याला जवळपास 3 मिलियन व्ह्यूज आली आणि तिथून त्यानं मागे वळून पाहिलं नाही.