16 वर्षांच्या नीलिमानंतर 22 वर्षांच्या सुप्रियावर जडला जीव...अशी आहे पंकज कपूर यांची लव्हस्टोरी

Pankaj Kapur Love Story: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आणि शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर यांचा आज वाढदिवस आहे. पंकज यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनाही आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. 

May 29, 2024, 17:58 PM IST
1/7

पंजाबमधील लुधियानामध्ये प्राध्यापकाच्या घरात त्यांचा 29 मे 1954 रोजी जन्म झाला. आईने लहानपणापासून अभिनयाचे धडे दिले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं पण एफटीआयमध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. ऑफिस-ऑफिस या मालिकेतील त्यांची मुसद्दीलालची भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. त्यांची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी आहे. 

2/7

पंकज कपूर यांचं पहिलं लग्न अभिनेत्री नीलिमा अझीमशी केलंय. 21 वर्षांचे पंकज आणि 16 वर्षांची नीलिमा यांची प्रेमकहाणी थिएटरमधून सुरु झाली. त्यांनी लग्न केल्यावर 1981 मध्ये त्यांना शाहिद कपूर झाला. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. वैवाहिक जीवनातील भांडणामुळे त्यांनी 1984 मध्ये घटस्फोट घेतला. 

3/7

त्यानंतर पंकज यांच्या आयुष्यात अभिनेत्री सुप्रिया पाठक आली. त्यांची पहिली भेट नया मौसम या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी सुप्रिया यांचाही घटस्फोट झाला होता. अशा परिस्थितीत ते दोघे जवळ आलेत. बराच काळानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

4/7

तसंतर पंकज कपूरच्या कुटुंबियांकडून या नात्याला होकार होता. पण सुप्रिया पाठक यांची आई आणि अभिनेत्री दिना पाठक यांना मान्य नव्हतं. आईच्या विरोध असतानाही सुप्रिया यांनी हे लग्न केलं. या दोघांना सना आणि ईशान खट्टर असे दोन मुलं आहेत. 

5/7

पंकज कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्यामध्येही नातं आहे हे खूप कमी लोकांना माहितीय. सुप्रिया पाठक यांची बहिण रत्ना पाठक ही नसीरुद्दीन शाह यांची बायको आहे. 

6/7

तर पंकज कपूर यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मुलगा शाहीद कपूरपेक्षा ते श्रीमंत असून लक्झरी लाइफ जगतात. मुंबईच्या यारी रोडवर त्यांचं आलिशान घर आहे. तर पंकज कपूर महिन्याला 3 लाखांपेक्षा अधिक कमाई करतात. 

7/7

पंकज कपूर यांच्याकडे जवळपास 132 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आर्थिक कमाईचा मुख्य स्त्रोत हे चित्रपट आहेत.