Parenting Tips: सकाळी उठल्यापासून लहान मुलांना लावा 'या' 10 सवयी, बना आदर्श पालक!

लहानपणी झालेले संस्कार आयुष्यभर राहतात. लहान मुलांना चांगल्या सवयी शिकवून याची सुरुवात होते.

Pravin Dabholkar | Feb 01, 2025, 16:49 PM IST

Parenting Tips: लहानपणी झालेले संस्कार आयुष्यभर राहतात. लहान मुलांना चांगल्या सवयी शिकवून याची सुरुवात होते.

1/13

Parenting Tips: सकाळी उठल्यापासून लहान मुलांना लावा 'या' 10 सवयी, बना आदर्श पालक!

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

Parenting Tips: अनेक मुलं अशी असतात ज्यांचे सर्वजण कौतुक करतात. त्यांच्यावर करण्यात आलेल्या संस्कारांचे दाखले दिले जातात. अशी मुले घडण्यासाठी पालकांचे मोठे योगदान असते. आई-वडील छोट्या-छोट्या गोष्टीतून मुलांना मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवतात. याचा मुलांच्या पर्सनालिटीवर खूप चांगला परिणाम होतो.

2/13

कमी वयात चांगल्या सवयी

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

लहानपणी झालेले संस्कार आयुष्यभर राहतात. लहान मुलांना चांगल्या सवयी शिकवून याची सुरुवात होते. यामुळे मुले वैयक्तिक तसेच प्रोफेशनल आयुष्यातदेखील प्रगती करतात. त्यामुळे मुलांना कमी वयात चांगल्या सवयी शिकवायला हव्यात. चांगल्या सवयींबद्दल जाणून घेऊया.

3/13

बालपणीच्या सवयी ठरवतात भविष्य

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

चांगल्या सवयी मुलांचे भविष्य घडवतात आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे मुलाला मोठे झाल्यावर या सवयी शिकण्याची गरज नसते. त्यांना शिकवणे अगदी लहान वयातच सुरू करता येते. कारण लहान मुलाला जे काही शिकवले जाते ते त्याच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनते. मुलामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे तज्ञ सांगतात.

4/13

वेळेचे व्यवस्थापन

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

मुलांना वेळेचे व्यवस्थापन शिकवले पाहिजे. त्यांना त्यांची दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करण्यास प्रोत्साहित करा. वेळापत्रकात फक्त अभ्यासच नसावा, तर खेळणे, झोपणे, खाणे इत्यादींसाठीही वेळ निश्चित करावी.

5/13

प्रोत्साहन द्या

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

तुमच्या मुलाला बाहेरच्या कामांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. त्याला/तिला योगा, नृत्य, व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा.

6/13

चुका स्वीकारायला शिकवा

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

मुलाला त्याच्या चुका स्वीकारायला शिकवले पाहिजे. असे असले तरी कोणत्याही चुकीसाठी मुलाला वारंवार टोकत राहू नये.

7/13

मोठ्यांचा आदर

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

आपल्याला मोठ्यांचा आदर करायला शिकवले पाहिजे. जेव्हा जेव्हा मुले एखाद्या वृद्ध व्यक्तीला भेटतात तेव्हा त्यांना मदत करण्यास, त्यांचे स्वागत करण्यास शिकवा.

8/13

शब्दांचे महत्व

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

मुलाला धन्यवाद, कृपया, माफ करा, यासारख्या शब्दांचे महत्त्व कळले पाहिजे.

9/13

चांगल्या वर्तनाचे महत्त्व

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

जर मूल काही चुकीचे बोलत असेल तर त्याला थांबवा आणि सांगा की यामुळे त्याची भाषा खराब होईल. हे काम सहजतेने करा. मुलाला चांगल्या वर्तनाचे महत्त्व समजावून सांगा.

10/13

चूक झाल्यावर माफी

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

चूक झाल्यावर माफी मागणे ही एक चांगली प्रथा आहे. म्हणून, मुलाला समजावून सांगा की जर त्याने चूक केली तर त्याने माफी मागावी. कधी आणि कोणत्या चुकीनंतर माफी मागावी, हे मुलांना समजवा.

11/13

छोटे शिष्टाचार

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

मुलाला छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. जसे की तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात तर कसे वागले पाहिजे. जर तुम्ही कोणाच्या घरात गेलात तर प्रथम बेल वाजवा. कोणाच्या घरी जाऊन तिथे घाण पसरवू नका. आत जाण्यापूर्वी बाहेरून बूट काढावेत इ.

12/13

थट्टा करु नये

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

मुलाला समजावून सांगा की एखाद्याची चेष्टा करणे ही चांगली गोष्ट नाही. लोकांचे कपडे, खाण्याच्या सवयी, रंग किंवा भाषेची थट्टा करू नये. कोणाच्याही शारीरिक किंवा मानसिक स्थितीची थट्टा करू नये.

13/13

पालकांची जबाबदारी

Parenting Tips Teach 10 habits in your children become an ideal parent

मुलांना काहीही शिकवण्याच्या आधी पालकांनी त्या सवयी आधी स्वत: अंगिकारा. लहान मुले तुम्हाला पाहून खूप काही शिकतात. त्यांच्यावर मोठा प्रभाव आई-वडिलांचा असतो. मुलं जे पाहतात,तेच करु लागतात. दोनवेळा ब्रश कर, असे मुलांना सांगण्याआधी पालकांनी स्वत: ब्रश करायला सुरुवात करा. मग तुम्हाला मुलांना शिकवण्यासाठी जास्त त्रास घ्यावा लागणार नाही. मुलांनी तुमची गोष्ट ऐकली तर त्याला बक्षिस द्या. यातून त्यांना प्रेरणा मिळेल.