'तुमच्यासारखं कोणी नाही', Anniversary निमित्त परिणीतीचा नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज

परिणीती चोप्राने Anniversary निमित्त शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो. समुद्रकिनारी दोघांनी साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस. पाहा फोटो

Soneshwar Patil | Sep 25, 2024, 17:46 PM IST
1/6

लग्नाचा वाढदिवस

24 सप्टेंबर 2023 रोजी परिणीती चोप्रा उदयपूरमध्ये राघव चढ्ढा यांच्यासोबत शाही लग्न सोहळा पार पडला होता. 

2/6

फोटो शेअर

आज या जोडप्याचे लग्न होऊन एक वर्ष झाले आहेत. परिणीतीने नवऱ्यासोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत.

3/6

निवांत क्षण

दोघांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस एकांतात एकमेकांसोबत चांगला वेळ घालवून साजरा केला आहे. 

4/6

सेलिब्रेशनचे फोटो

अभिनेत्रीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघे समुद्राच्या किनारी शांत बसलेले दिसत आहेत. 

5/6

रोमँटिक लूक

या फोटोमध्ये परिणीती तिच्या नवऱ्याला मिठी मारत आहे. दोघेही एकमेकांचा हात धरून समुद्रकिनारी फिरत आहेत. 

6/6

कॅप्शन

तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, आम्ही शांत दिवस घालवला. जिथे फक्त आम्ही दोघेच होतो. त्यावेळी आम्ही प्रेक्षकांचे मेसेज वाचत होतो.