हळदीच्या रंगात रंगला ‘भल्लाळदेव’
कोरोना कालावधीत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 8 ऑगस्ट रोजी आपली मिहिका बजाज सोबत लग्न करणार आहे. कोरोना कालावधीत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. या शुभवेळी राणा दग्गुबती आणि मिहिका बजाज दोघेही हळदीच्या रंगात रंगून निघाली होती. सध्या त्यांच्या हळदी समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...