बाईsss.. हा काय प्रकार... 'या' देशात पोलिस चक्क रेड्यावरुन घालतात गस्त

असा कोणता देश आहे जिथे पोलिस वाहनाने नाही तर चक्क रेड्यावरुन गस्त घालतात? जाणून घेऊया...

वनिता कांबळे | Sep 27, 2024, 17:56 PM IST

Police patrol Brazil island on water buffalos :  जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ही पोलिसांवर असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा आढावा घेण्यासाठी पोलिस गस्त घालत असतात. गस्त घालण्यासाठी पोलिस बाईक किंवा कार यांचा वापर करतात. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे पोलिस कोणत्याही वाहनाने नाही तर चक्क रेड्यावर बसुन गस्त घालतात. 

 

1/7

 जगात एक असा देश आहे जिथे पोलिस वाहनाने नाही तर चक्क रेड्यावर बसुन शहरात गस्त घालतात  

2/7

या बेटावरील भौैगोलिक स्थिती पाहता येथे वातावरण सातत्याने बदलत असते. अनेकदा येथे पुरस्थिती असते. अशा स्थितीत चिखलातून मार्ग काढण्यासाठी हे रेडो सोईस्कर ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.   

3/7

 रेड्यांच्या या प्रजाती भारत आणि आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये आढळते. हे आशियाई रेडे या बेटावर कसे पोहोचले हे देखील एक कोडंच आहे. 

4/7

येथे लष्करी पोलीस गस्त घालण्यासाठी चक्क रेड्यांचा वापर करतात.  एशियन वॉटर बफेलोज या प्रजातीचे हे आशियाई रेडे आहेत.

5/7

स्वीत्झर्लडच्या आकाराचे हे बेट अत्यंत सुंदर आणि जैववैविध्याने नटलेले आहे. पोलिसांच्या गस्तीमुळे हे बेट चर्चेत आले आहे.   

6/7

ब्राझीलमधील उत्तर भागात जिथे अमेझॉन नदी आणि अटलांटिक महासागराचा संगम होतो  तेथे माराजो नावाचे एक बेट आहे.   

7/7

ब्राझील या देशात पोलिस रेड्यावर बसुन शहरात गस्त घालतात. यामागे खूपच इंटरेस्टिंग कारण आहे.