राजेशाही थाटाला ट्रेंडची जोड; महाराष्ट्रातल्या यशस्वी नेत्यांच्या घरातल्या मुला-मुलींची नावं आणि त्याचा अर्थ!

Popular Maharashtra Leaders Childrens Names in Marathi:  महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही नवीन नावांचा ट्रेंड पाहायला मिळतो. अनेक दिग्गज राजकीय व्यक्तींच्या मुलांची आणि नातवंडांची युनिक आणि मॉर्डन नावे जाणून घ्या अर्थ.   

| Jan 30, 2024, 17:44 PM IST

Popular Maharashtra Leaders Childrens Names in Marathi: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पारंपरिक वारसा आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांनी हा वारसा आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या नावात जपल्याचं दिसतं. महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींनी दिलीत अतिशय युनिक आणि ट्रेंडी नावे. जाणून घ्या नावांचे अर्थ. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी नावे ठेवायला नक्कीच मदत होईल. 

1/11

एकनाथ शिंदे यांचा नातू

Popular Maharashtra Leaders Baby Names

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक नातू आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मुलाचे नाव रुद्रांश असे आहे. रुद्रांश या नावाचा अर्थ आहे 'शिवाचा अंश'. 

2/11

नितीन गडकरी यांची नातवंडे

Popular Maharashtra Leaders Baby Names

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन मुले निखिल गडकरी आणि सारंग गडकरी. नितीन गडकरी यांना पाच नातवंडे आहेत.  निखिल गडकरी यांच्या मुलींची नावे 'नंदिनी', 'सानवी', 'कावेरी'.  नंदिनी - पवित्र व्यक्ती, आनंद देणारी गंगा  सानवी - पार्वती देवी, लक्ष्मी  कावेरी - पवित्र नदीचे नाव सारंग  गडकरी यांना दोन मुले आहेत 'निनाद', 'अर्जुन' निनाद या नावाचा अर्थ आहे 'पाण्याचा सौम्य आवाज' अर्जुन या नावाचा अर्थ आहे 'आत्मविश्वास', 'शक्ती'

3/11

छगन भुजबळ यांची नातवंडे

Popular Maharashtra Leaders Baby Names

छगन भुजबळ यांना तीन मुले समीर, पंकज आणि दुर्गा. छगन भुजबळांना एकूण चार नातवंडे आहेत. जगातील देवी आणि पृथ्वी असा या नावाचा अर्थ आहे.  पंकज भुजबळ यांना दोन मुली आहेत. ज्यांची नावे अनुक्रमे देविशा, तनिष्का अशी आहे. देविशा नावाचा अर्थ आहे शांतता, अतिशय हुशार तर तनिष्का या नावाचा अर्थ आहे सोन्याची देवी असा याचा अर्थ आहे.  दुर्गा वाघ यांना एक मुलगा असून याचे नाव दुष्यंत असे आहे. वाईटाचा नाश करणारा असा या नावाचा अर्थ आहे. 

4/11

विलासराव देशमुख

Popular Maharashtra Leaders Baby Names

विलासराव देशमुख यांना धीरज, अमित आणि रितेश अशी तीन मुले आहे.  धीरज देशमुख यांच्या मुलाचे नाव 'वंश'. या नावाचा अर्थ आहे कुलदिपक अमित देशमुख यांना 'अविर' आणि 'अवन' अशी दोन मुले आहे. 'अविर' या नावाचा अर्थ आहे हुशार आणि शूर असा या नावाचा अर्थ आहे. 'अवन' या नावाचा अर्थ आहे 'पाणी'.  रितेश देशमुखला दोन मुले आहेत. 'रियान' आणि 'राहील' अशी नावे असून याचे अर्थ आहे 'छोटा राजा', 'राज्य करणारा' आणि राहील नावाचा अर्थ आहे 'निरागस'. 

5/11

धनंजय महाडिक

Popular Maharashtra Leaders Baby Names

कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांना तीन मुले. यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक यांच्या मुलाचे नाव आहे अमरेंद्र. धनंजय महाडिक यांच्या पत्नीने हे नाव ठेवले आहे. आजीने ठेवलेल्या या नावाचा अर्थ आहे 'देवाचा राजा', 'देव'.

6/11

सत्यजित तांबे यांची मुले

Popular Maharashtra Leaders Baby Names

आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मुलांना संस्कृती जपणारी नावे दिली आहेत.  सत्यजित तांबे यांच्या मुलीचे नाव अहिल्या. या नावाचा अर्थ आहे युवती. अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा आदर्श घेत हे नाव ठेवले आहे.  सत्यजित तांबे यांच्या मुलाचे नाव सूर्या. सूर्या म्हणजे सूर्य, देवाचा मुलगा. 

7/11

राजेंद्र दर्डा यांचा नातू

Popular Maharashtra Leaders Baby Names

राजेंद्र दर्डा यांच्या नातवाचे नाव रिशान असे आहे. या नावाचा अर्थ आहे 'भगवान शिव' आणि 'अध्यात्म'. 

8/11

रोहित पवार यांची मुले

Popular Maharashtra Leaders Baby Names

शरद पवार यांचा नातू रोहित पवार राजकारणात अग्रेसर आहेत. रोहित पवारांना दोन मुलं आहे. आनंदिता रोहित पवार - आनंदी राहणारी, आनंद असा या नावाचा अर्थ आहे. शिवांश रोहित पवार - शिवाचा अंश असा या नावाचा अर्थ आहे.       

9/11

राज ठाकरे यांचा नातू

Popular Maharashtra Leaders Baby Names

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेला मुलगा आहे. कियान अमित ठाकरे असं त्याचं नाव. 'कियान' या नावाचा अर्थ आहे 'देवाची कृपा', 'राजेशाही', 'प्राचीन'

10/11

रावसाहेब दानवे यांच्या नातवंडांची नावे

Popular Maharashtra Leaders Baby Names

रावसाहेब दानवे यांना तीन मुली एक मुलगा. ज्यांची नावे आशाताई मुकेश पांडे, संजना जाधव आणि उषाताई असे आहे,  संतोष दानवे यांना दोन मुली आहेत ज्यांची नावे 'युवराज्नी', 'वसुंधरा' या नावाचा अर्थ आहे 'राजकुमारी' आणि 'पृथ्वी' असा याचा अर्थ आहे.  आशाताई मुकेश पांडे यांना दोन मुलं आहेत. 'शिवम' आणि "नंदिनी' अशी त्यांची नावे आहेत. नावाचा अर्थ आहे 'शंकर, शिव' आणि 'आनंदी मुलगी' असा आहे.  संजना जाधव यांच्या मुलाचे नाव आदित्यवर्धन जाधव असे आहे. या नावाचा अर्थ आहे 'जो सूर्याला सुशोभित करतो असा.' उषाताई माहेशराव अकात यांना तीन मुले आहेत. देवयानी, मानसी, आर्यमा अशी ही नावे आहेत. देवयानी म्हणजे देवाचे रुप, मानसीचा अर्थ सरस्वती आणि आर्यमा या नावाचा अर्थ आहे सूर्य. 

11/11

नारायण राणे यांची नातवंडे

Popular Maharashtra Leaders Baby Names

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन मुले निलेश राणे आणि नितेश राणे. निलेश राणे यांच्या मुलाचे नाव 'अभिराज'. या नावाचा अर्थ आहे 'निर्भय राजा' नितेश राणे यांच्या मुलाचे नाव 'निमिश'. या नावाचा अर्थ आहे 'क्षणिक', 'भगवान रामाचा पूर्वज'