अभिनेत्याचा जन्मानंतर आईचं निधन, वयाच्या 13 व्या वर्षी ड्रग्सचं व्यसन; पहिलं लग्न मोडल्यानंतर आता करणार दुसरं लग्न
Entertainment : बॉलिवूडमधील हा स्टारकिड आई वडिलांसारखं नाव कमावू शकला नाही. त्याचा जन्मानंतर 15 दिवसांमध्येच आईचं निधन झालं. विवाहबाह्य संबंधातून त्याचा जन्म झाल्यामुळे आजी विद्याताई पाटील आणि मावशी मन्या पाटील यांनी त्याचं संगोपन केलं.
1/7

2/7

3/7

प्रतिक बब्बरचे वडील राज यांचं लग्न ज्येष्ठ रंगमंच कलाकार नादिरा झहीर बब्बर यांच्याशी झालं होतं. या लग्नातून त्यांना दोन मुलं आर्या आणि जुही होते. लग्ना आणि दोन मुलं असतानाही राज बब्बर स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले. नादिराला सोडून ते स्मितासोबत राहिला गेले. विवाहबाह्य संबंधामुळे राज आणि स्मिता यांनी त्या काळात समाजाला तोंड द्यावे लागले. डिसेंबर 1986 मध्ये स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर, राज बब्बर पहिली पत्नी नादिरा बब्बरकडे परले. नादिरा यांनी स्मिताचा मुलगा प्रतीकचा स्विकार केला.
4/7

खरं तर, प्रतीकच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्याच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्याची आई जाणं. या एकटेपणाने प्रतीकलाही चुकीच्या मार्गावर घेऊन गेले. वयाच्या 13 व्या वर्षी त्याला ड्रग्जचे गंभीर व्यसन लागले होते. यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी त्यांना पुनर्वसन केंद्रात जावे लागलं होतं, तेव्हाच ते या व्यसनातून मुक्त होऊ शकला.
5/7

6/7
