शपथविधी प्रियंका गांधींचा मात्र चर्चा साडी अन् इंदिरा गांधींची! जाणून घ्या संसदेत आज नेमकं घडलं काय

शपथविधी प्रियंका गांधींचा मात्र चर्चा साडी अन् इंदिरा गांधींची! जाणून घ्या संसदेत आज नेमकं घडलं काय

Priyanka Gandhi Oath Saree : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज संसदेत शपथ घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी प्रियंका गांधी अतिशय सुंदर आणि साध्या पारंपारिक साडी नेसून पोहोचल्या होत्या. प्रियंका गांधी यांच्या शपथविधीसोबतच इंदिरा गांधी आणि लूकची जोरदार चर्चा झाली. 

 

1/7

अतिशय खास दिवस

प्रियंका गांधी यांच्याकरिता आजचा दिवस अतिशय खास आहे. या खास क्षणी प्रियंका गांधी यांनी भारतीय संस्कृतीचा पेहराव करताना दिसल्या. यावरुन लक्षात येतं की, प्रियंका गांधी आपला देश आणि मातीशी किती जोडलेल्या आहेत. 

2/7

केरळच्या संस्कृतीची झलक

केरळच्या वायनाडमधील जागेवर विजय पटकावून प्रियंका गांधी खासदार झाल्या आहेत. यामुळे शपथविधी दरम्यान साऊथची संस्कृती जपताना प्रियंका गांधी दिसल्या. 

3/7

कोणती साडी नेसली?

प्रियंका गांधी यांनी यावेळी कॉटनची साऊथची पारंपरिक साडी 'कासवु' परिधान केली होती. या साडीचा ब्लाऊज देखील तसाच अतिशय सुंदर आणि साथा होता. ज्याच्या बाजूवर गोल्डन रंगाची पट्टी होती. कानामध्ये छोटे मोती रंगाचे इयररिंग्स घातले होते. हे इयररिंग्स साडीसोबत परफेक्ट मॅच होते. 

4/7

संविधान महत्त्वाचे

प्रियंका गांधी यांनी खासदार पदाची शपथ घेताना हातामध्ये संविधानाची कॉपी घेतली होती. प्रियंका गांधी यांची ही कृती लक्षवेधी ठरली. 

5/7

हेअर स्टाइल

प्रियंका गांधी यांचा कायमच लूक लक्षवेधी असतो. पण शपथविधीच्या वेळी हेअर स्टाइल अतिशय साधी आणि दरवेळीप्रमाणे नॉर्मल होती. यावेळी प्रियंका गांधीने हलक्या लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. 

6/7

इंदिरा गांधीची झलक

प्रियंका गांधी यांचा लूक यावेळी खूप लक्षवेधी ठरला. यावेळी प्रियंका गांधी यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत तुलना करण्यात आली. या दोघी यावेळी एकसारखेच दिसत असल्याची चर्चा रंगली. 

7/7

राहुल गांधींनी काढला फोटो

प्रियंका गांधी संसद भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असताना राहुल गांधी यांनी त्यांना थांबवून फोटो काढले. प्रियंका गांधी यांचा शपथविधी पाहण्यासाठी मुलगा रेहान आणि मुलगी मिराया देखील पोहोचली होती.