Promise Day : वचन तुला माझ्याकडून.... प्रॉमिस डेच्या मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Week 5th Day : प्रॉमिस डे मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सुंदर आणि रोमँटिक मॅसेज एकमेकांना पाठवू शकता. पाहा तसेच काहीसे नमुने. 

11 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस आहे. हा दिवस 'प्रॉमिस डे' म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी जोडपे एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा शब्द देतात. अशावेळी एकमेकांना सुंदर आणि मराठमोळे असे रोमँटिक मॅसेज पाठवा. 

1/9

कधीच नाही बोलता आले ते सारे काही आज मांडणार आहे, तुझीच होऊन राहीन जन्मभर हेच तुला वचन देत सांगणार आहे  

2/9

तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही काही. तू आहेस तर मी आहे, तुला आयुष्यात कायम अशीच साथ देत राहीन, जपेन तुला मरेपर्यंत, देतेय आज मी वचन, Happy Promise Day!

3/9

प्रेमात बांधिलकी असते महत्त्वाची आणि आज तीच मी तुला देण्याचं वचन देतो, कारण तुझ्याशिवाय माझं आयुष्य आहे अपूर्ण, मला फक्त करायचं तुझ्याशीच लग्न, Happiest Promise Day!

4/9

प्रेम कसं असतं ते मला तुझ्यात बघायचंय, भरभरून कायम तुझ्यावर प्रेम करायचंय, श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण वचन देतोय मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय

5/9

चंद्राचा अत्यंत शीतल असा गारवा, मनात फुलतोय प्रेमाचा पारवा, या रम्य संध्याकाळी फक्त तुझा हात हाती हवा, वचन देतो तुला कधीही न येईल हा दुरावा, Happy Promise Day, My Love!  

6/9

 वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील हॅपी प्रॉमिस डे   

7/9

माझी मैत्रीण, माझं सर्वस्व, माझी बायको हे सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो आणि ती तू आहेस. मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन हॅपी प्रॉमिस डे  

8/9

 एक प्रॉमिस माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल. हॅपी प्रॉमिस डे    

9/9

 तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी येचे तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर हेच प्रॉमिस करूया एकमेकांना आपण हॅपी प्रॉमिस डे