Public Provident Fund बाबत मोठी बातमी; कोट्यवधी खातेधारकांना होणार फायदा

PPF Scheme Interest Rate 2023: पुढच्या महिन्यात पीपीएफ खातं असणाऱ्या कोट्यवधी खातेधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण अर्थ मंत्रालयाकडून जुलै- सप्टेंबरचं त्रैमासिक धोरण आणि लहान ठेवींसाठीच्या योजनांवरील व्याजदराची घोषणा केली जाणार आहे.   

| May 30, 2023, 10:23 AM IST

PPF Scheme Interest Rate 2023: जसं प्रत्येक व्यक्तीसाठी बँकेत असणारं Saving Account महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीसाठी पीपीएफ (PPF) खात्याचंही तितकंच महत्त्वं असतं. अशा सर्व खातेधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी. 

1/7

व्याजदरात बदल ?

Public Provident Fund interest hike news latest updates

31 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या धोरणामध्ये व्याजदरात कोणतेही बदल न करता तो 7.1 टक्क्यांवरच ठेवण्यात आला होता. तर, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात शासनानं अर्ध्या टक्क्यानं वाढ केली होती. 

2/7

पीपीएफ खातं

Public Provident Fund interest hike news latest updates

पीपीएफ खात्याविषयी सांगावं तर, गेल्या 12 त्रैमासिक धोरणांमध्ये व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे यावेळी मात्र या बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

3/7

व्याजदर वाढणार?

Public Provident Fund interest hike news latest updates

सूत्रांच्या दाव्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून यावेळी पीपीएफ खात्यावरील व्याजदर वाढवून तो 7.6 टक्क्यांपर्यंत नेण्यात येईल.   

4/7

केंद्र शासनाची घोषणा

Public Provident Fund interest hike news latest updates

शासनानं ही घोषणा केल्यास सर्व पीपीएफ खातेधारकांना याचा फायदा मिळणार आहे. तुम्हीही त्यात असाल तर तुम्हीही लाभार्थी ठराल यात शंका नाही. 

5/7

माहितीसाठी....

Public Provident Fund interest hike news latest updates

माहितीसाठी, तुम्ही पीपीएफ खात्यात एका वर्षात किमान 500 रुपयांपासून जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. इथं तुम्हाला Income Tax Sec 80C अंतर्गत सवलतही मिळते.   

6/7

समाधानकारक व्याज

Public Provident Fund interest hike news latest updates

शासनाकडून देण्यात येणाऱ्या काही योजनांपैकी अशाची ठराविक योजना आहेत ज्यांवर समाधानकारक व्याज मिळतं. 

7/7

पाहा त्या योजना...

Public Provident Fund interest hike news latest updates

अशाच काही म्हणजे सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (8.2 टक्के व्याज), नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट (7.7 टक्के व्याज), सुकन्या समृद्धि योजना (8 टक्के व्याज), किसान विकास पत्र (7.5 टक्के व्याज)