'या' देशात तणाव दूर करण्यासाठी करतात 'हा' अनोखा उपाय

नवी दिल्ली : दररोजच्या धावपळीच्या जीवनात रोज काही ना काही अशा गोष्टी होत असतात ज्याने व्यक्ती तणावग्रस्त होत असतो. तणावामुळे कोणत्याही कामात मन लागत नाही. कामाच्या ठिकाणीच नाही तर आपल्या स्वत:च्या अनेक गोष्टींमुळे, घरातील मतभेदांमुळे माणूस तणावात जातो. अशा परिस्थितीत तणाव कमी करण्याची गरज असते. न्यूयॉर्कमधील एका डिजाइन स्टुडिओने कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी एक अनोखा मार्ग आणला आहे. स्टुडिओने रस्त्यांवर अनेक ठिकाणी पंचिंग बॅग लावल्या आहेत. त्यामुळे लोकं या बॅगवर लाथा-बुक्के मारुन आपला तणाव काही प्रमाणात कमी करु शकतील.

Jun 06, 2019, 13:35 PM IST
1/6

गेल्या महिन्यात आलेल्या गॅलप आतंरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील लोकांना सर्वाधिक तणावग्रस्त असलेल्या लोकांच्या यादीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांमध्ये राग, चिंता, तणावचे प्रमाण गेल्या १० वर्षांमध्ये सर्वात जास्त वाढले आहे.

2/6

'गॅलप'नुसार, अमेरिकामध्ये ५५ टक्के वयस्कर लोक मानतात की, त्यांना दिवसांतील सर्वाधिक वेळ तणावातून जावे लागते. तर ४५ टक्के लोकांची तक्रार आहे की, त्यांना पुढील येणाऱ्या दिवसांची अधिक चिंता असते. 

3/6

न्यूयॉर्कच्या एका डिझाइन स्टुडिओने कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. स्टुडिओने रस्त्यांवर ठिक-ठिकाणी पंचिग बॅग लावल्या आहेत. त्यामुळे लोक त्यावर लाथा-बुक्के मारुन आपला तणाव दूर करु शकतात.

4/6

पंचिंग बॅगची कल्पना आलेली कंपनी ‘डोंट टेक दिस रॉन्ग वे’ने ही कल्पना न्यूयॉर्क डिझाइन वीकमध्येही सादर केली. कंपनीचे म्हणणे आहे की, या संकल्पनेनुसार, आम्ही कर्मचाऱ्यांच्या त्या भावनांना जाहिर करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो, ज्या सर्वसामान्य व्यक्ती दररोजच्या जीवनात करु शकत नाही. 

5/6

या पंचिंग बॅग ठिकठिकाणी लावण्यात आल्यानंतर तरुण तसेच वयोवृद्धही त्या बॅगवर मारताना दिसतात. सोशल मीडियावर हे फोटोही व्हायरल होत आहेत. लोकांकडूनही तणाव कमी करण्यासाठी या उपायाला चांगली पसंती मिळत आहे.  

6/6

स्वत:ला स्वस्थ ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे. तणाव वाढत गेल्यास त्याचा शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होत असतो.