नागपुरमध्ये R Ashwin ने कांगारूंना आपल्या फिरकीवर नाचवलं; हे रेकॉर्ड केले आपल्या नावे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात अश्विनने 8 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात त्याला पाच विकेट्स घेण्यात यश आले.

Feb 11, 2023, 23:24 PM IST
1/5

भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 डावाने विजय मिळवला आहे. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केलीये.

2/5

या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केलाय.

3/5

रविचंद्रन अश्विनने या सामन्याच्या पहिल्या डावात 15.5 षटके टाकत 3 बळी घेतले. पण दुसऱ्या डावात आर अश्विन आणखीनच मारक दिसला आणि सुरुवातीच्या 7 विकेट्सपैकी 5 विकेट घेतल्या.

4/5

इनिंगमध्ये त्याने 5 विकेट पूर्ण करताच अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

5/5

आर अश्विनने भारताकडून 25 व्यांदा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी केवळ अनिल कुंबळेने भारतात खेळताना 25 डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम केला होता.