Success Story: ग्लॅमरचे जग सोडून 10 महिन्यात क्रॅक केली UPSC, मिस इंडिया फायनलिस्ट 'अशी' बनली IFS

  ऐश्वर्या शेओरन 'ब्युटी विथ ब्रेन' आयएफएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

Pravin Dabholkar | Feb 13, 2025, 13:57 PM IST

UPSC Success Story:  ऐश्वर्या शेओरन 'ब्युटी विथ ब्रेन' आयएफएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

1/8

Success Story: ग्लॅमरचे जग 10 महिन्यात क्रॅक केली UPSC, मिस इंडिया फायनलिस्ट 'अशी' बनली IFS

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

UPSC Success Story: ऐश्वर्या शेओरन 'ब्युटी विथ ब्रेन' आयएफएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. ऐश्वर्या यांनी 2014 मध्ये 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस' आणि नंतर 'मिस इंडिया फेमिना' फायनलिस्ट बनल्या होत्या.

2/8

यूपीएससीमध्ये 93 वा क्रमांक

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम घ्यायची तयारी असेल तर अशक्य असे काहीही नाही. 2018 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये 93 वा क्रमांक मिळवला.

3/8

मॉडेलिंग ते यूपीएससी पर्यंतचा प्रवास

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

मॉडेलिंगच्या ग्लॅमरस कारकिर्दीला सोडून ऐश्वर्या यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या परीक्षेसाठी तरुण कित्येक वर्षे दिवस रात्र एक करुन तयारी करत असतात.  विशेष म्हणजे ऐश्वर्या यांनी फक्त 10 महिन्यांच्या तयारीत ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.

4/8

ऐश्वर्याच्या यशाचे मुख्य कारण

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता पण माझे ध्येय स्पष्ट होते. मी एक वेळापत्रक बनवले आणि त्यानुसार अभ्यास सुरु केला. ज्यात मी रोज 10 ते 12 तास अभ्यास करायची असे ऐश्वर्या सांगतात. एनसीईआरटी आणि मानक पुस्तकांवर लक्ष केंद्रित करणे हे ऐश्वर्याच्या यशाचे मुख्य कारण बनले.

5/8

सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती शाळेत शिकणाऱ्या ऐश्वर्याने 97.5% गुण मिळवून बारावीत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी मिळवली. त्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे आणि हे त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि शिस्तीचे प्रतीक आहे.

6/8

प्रेरणादायी कहाणी

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी ऐश्वर्या यांची कहाणी प्रेरणादायी आहे. योग्य रणनीती आणि दृढनिश्चयाने तुम्ही कोणत्याही आव्हानावर मात करू शकता हे त्यांनी दाखवून दिले. आज ऐश्वर्या केवळ एक यशस्वी अधिकारी नाही तर त्या तरुणांसाठी एक आदर्श देखील आहे. त्यांचा प्रवास  आपली स्वप्ने सत्यात उतरवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक धडा आहे.

7/8

यूपीएससी तयारीसाठी टिप्स

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

यूपीएससीची तयारी करताना शिस्त आणि योग्य रणनीती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही दररोज 10-12 तास अभ्यास करावा आणि एक काटेकोर वेळापत्रक बनवावे. एनसीईआरटी आणि मानक पुस्तकांमधून संकल्पना स्पष्ट करा, असे आवाहन आयएफएस ऐश्वर्या शेओरन करतात.

8/8

स्वतःवर विश्वास ठेवा

Success Story Model to IFS Aishwarya Sheoran Inspirational Marathi news

रिव्हीजन करायला प्राधान्य द्या आणि नोट्स बनवा. मॉक टेस्ट द्या आणि तुमच्या कमकुवतपणावर काम करा, असे त्या सांगतात. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या योग्य साहित्याचा वापर करा पण त्यावर जास्त विसंबून राहू नका, स्वतःवर विश्वास ठेवून कठोर परिश्रम करत रहा. असेही त्या सांगतात.