Rahu Gochar 2023: राहु गोचरमुळे 'या 'लोकांचं नशीब उजळणार, महालक्ष्मीचीही राहिल सदैव कृपा

Rahu Gochar 2023:  ज्योतिष शास्त्रानुसार शनि, राहु आणि केतुच्या गोचरला खूप महत्त्व आहे. शनि, राहु-केतुजर कुंडलीत स्थिती नसेल तर त्यांची जीवन संक्रांतीच्या कारणानं संकटांनी भरून जाते. 2023 मध्ये राहूचे संक्रमण होणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सगळ्या राशींवर होणार असला तरी देखील काही राशींना खूप लाभ मिळतो.

Mar 13, 2023, 17:49 PM IST
1/5

Rahu Gochar 2023

ज्योतिषशास्त्रात राहुला अशुभ आणि उपछाया ग्रह मानले जाते. सध्या तो मेष राशीत संक्रमण करत आहे. पण जेव्हा राहु हा मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक लोकांचे नशिब चमकणार आहे. 

2/5

Rahu Gochar 2023

मिथुन राशीच्या 11व्या घरात राहुचे भ्रमण प्रतिगामी गतीने होणार आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. मोठे खर्च होतील, पण पैशाच्या आगमनामुळे संतुलन राखले जाईल. व्यवसाय वाढवायचा असेल तर हा काळ अनुकून राहणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना प्रमोशन मिळू शकते. 

3/5

Rahu Gochar 2023

कर्क राशीच्या 10व्या घरात हे संक्रमण होणार आहे. तेव्हा खर्च वाढतील. पण अचानक पैशाच्या आगमनाने त्यांची भरपाई होईल. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

4/5

Rahu Gochar 2023

राहू वृश्चिक राशीच्या सहाव्या भावात प्रवेश करेल. विरोधकांना अपयशाचा सामना करावा लागेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र आणि नातेवाईक यांच्या नात्यात गोडवा राहील.

5/5

Rahu Gochar 2023

कुंभ राशीच्या तिसऱ्या घरात राहूचे संक्रमण होणार आहे. यामुळे त्यांच्यावर शुभ परिणाम होतील. करिअरसाठी ही वेळ खूप चांगली राहणार आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)