1/8

मुंबई : साऊथमध्ये अगदी देवाप्रमाणे पूजणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68 वा वाढदिवस. रजनीकांत यांची जादू फक्त साऊथमध्येच नाही तर संपूर्ण देशभर पसरली आहे. रजनीकांत यांचे सिनेमे फक्त साऊथमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. रजनीकांत यांची क्रेझ इतकी आहे की त्यांचा प्रत्येक सिनेमा हा सोहळ्याप्रमाणे साजरा होतो. आज त्यांचा वाढदिवस.. या दिवशी आपण त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया....
2/8

रजनीकांत आणि लता यांच्या लग्नाला आज 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण असं असलं तरीही आजही त्यांच प्रेमही आहे तसंच आहे. 1980 ची गोष्ट रजनीकांत त्यावेळी बालाचंदर यांच्या तामिळ सिनेमा 'थिल्लू मल्लू'चं शुटिंग करत होते. हा सिनेमा 1979 मध्ये बॉलिवूडमध्ये आलेल्या 'गोलमाल'ची रिमेक होती. हाच रजनीकांत यांचा पहिला कॉमेडी सिनेमा.
3/8

याच सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रजनीकांत यांना एका मुलाखतीबाबत विचारण्यात आलं. ही मुलाखत एका कॉलेज मॅगझीनकरता होती. यावेळी मुलाखत घेण्याकरता कॉलेजकडून लता यांना पाठवण्यात आलं. आणि तेव्हाच रजनीकांत लता यांना पहिल्यांदा बघून प्रेमातच पडले. मुलाखतीदरम्यान बंगलुरू कनेक्शन निघालं आणि दोघं अतिशय कर्म्फटेबल झाले.
4/8

5/8

6/8

7/8
